केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी तेलावरील कर कमी करून नागरिकांना एक दिलासा दिला आहे. केंद्र शासनाकडून प्रति लिटर 2.5 रुपयांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कमी करण्यात आल्या आहेत. त्यापैकी 1.50 रुपये हे तेलावरील (Excise duty) कर कपात करून तर बाकी 1 रुपया हा ऑइल मार्केटींग कंपन्यांकडून कमी करण्याचे आदेश अरुण जेटली यांनी दिले आहेत, असे एकूण 2.50 रुपयांनी पेट्रोल आणि डिझेल कमी झाले आहे.

अरुण जेटलींनी देशातील सर्व राज्यांना विनंती केली की राज्य सरकारांनी सुद्धा तेलावरील राज्यतील व्हॅल्यु अडेड टॅक्स म्हणजे VAT 2.5 रुपयांनी कमी करावे जेणेकरून देशातील जनतेला एक लिटर पेट्रोल-डिझेल मागे कमीतकमी एकूण 5 रुपयांचा फायदा मिळेल. या विनंतीची दखल घेत गुजरात आणि महाराष्ट्र या दोन भाजप शासित राज्यात ताबडतोब VAT कमी केला गेला आहे.

वित्त मंत्री अरुण जेटली यांच्या घोषणेनंतर लगेच काही मिनिटातच गुजरातमध्ये 2.50 रुपयांनी पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी करण्यात आल्या. त्यानंतर महाराष्ट्र सरकारने सुद्धा फक्त पेट्रोलच्या किमती लगेच 2.50 रुपयांनी कमी केल्या. त्यामुळे आता केंद्राने दिलेली 2.50 रुपयांची सूट आणि महाराष्ट्राने दिलेली 2.50 रुपयांची सूट अशी एकूण 5 रुपयांनी पेट्रोल स्वस्त झाले आहे. महाराष्ट्रात डिझेलच्या किंमतीवर सध्यातरी काही चर्चा नाही.

“जनतेला 2.50 रुपयांचा फायदा करून द्यायचं का नाही हे तेथील राज्य सरकार आणि ऑइल मार्केटींग कंपन्यांच्या हातात आहे. केंद्र सरकाने 2.50 रुपये कमी केले आहेत, आता राज्य सरकारांनी सुद्धा पुढे यावे आणि VAT कमी करून जनतेला प्रति लिटर 5 रुपयांचा फायदा करून घ्यावा.” असे वित्त मंत्री अरुण जेटली यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here