भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीं हे दोन दिवसांच्या वाराणसी दौऱ्यावर आहेत. त्यांनी आपल्या मतदारसंघाला म्हणजेच वाराणसीला 550 कोटी रुपयांच पॅकेज जारी केलं आहे. त्यांनी आपल्या भाषणाची सुरुवात ‘हर हर महादेव’ या जयघोषाने करत, नंतर बोलताना सांगितलं आहे की, “मागच्या चार वर्षात वाराणसीचा चेहरा मोहरा बदलला आहे. सध्याची वाराणसी ही काँग्रेसच्या काळातील वाराणसी पेक्षा खूपच सुधारलेली आहे, जे काही काम वाराणसी साठी आम्ही केलो आहोत ते जनतेला स्पष्ट दिसतंय,” असंही ते म्हणाले.

“आमचा मानस जुन्या परंपरा, संस्कृती आणि वारसा यांच्याशी समतोल साधत काशीमध्ये संपूर्णतः होकारार्थी बदल घडवून आणण्याचा आहे. नाहीतर तुम्ही पाहिलेच आहेत या आधीच्या सरकारने काशी सारख्या पवित्र शहराला कसं राम भरोसे सोडलं होतं ते. ” असंही मोदी म्हणाले.

मंगळवारी पंतप्रधानांनी उदघाटन केलेल्या प्रोजेक्ट्स मध्ये जुन्या काशीसाठी समायोजित ऊर्जा विकास योजना(Integrated Power Development Scheme) आणि बनारस हिंदू विद्यापीठासाठी Atal Incubation centre यांचा समावेश आहे. याच प्रोजेक्ट्स अंतर्गत बनारस हिंदू विद्यापीठात विभागीय नेत्रविज्ञान केंद्राच्या(Regional Opthalmology Centre) बांधकामाचा शुभारंभ करण्यात आला.

पंतप्रधानाच्या घोषणेनंतर उत्तर प्रदेशचे भाजप प्रदेशाध्यक्ष महेंद्र नाथ पांडे आपल्या भाषणात म्हणाले की हे 550 कोटींचे प्रोजेक्ट्स एकतर जनतेला समर्पित असतील नाहीतर जनतेसाठीच्या या लोककल्याणकारी कामांना समर्पित असतील. ही विकास कामे फक्त वाराणसीच नाही तर आजूबाजूच्या सर्व भागानाही फायद्याचे ठरतील.

नरेंद्र मोदी आपल्या भाषणात आणखी पुढे म्हणाले की,” वाराणसीतुन लोकसभेसाठी निवडून जाण्यापूर्वी जेंव्हा मी आमदार असताना वाराणसीला भेट दिली होती, तेंव्हा मला वाटायचं की वाराणसी या विजेच्या तारांच्या जाळ्यापासून कधी मुक्त होईल, कोण याला दूर करतील अशी चिंता मला होती. परंतु हे काम बाबा विश्वनाथ आणि आई गंगेनी मला सोपवून मला सार्थक केलं. ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. या चार वर्षात मोठ्याप्रमाणात वाराणसीतील विजेच्या तारांच्या जाळ्यांचे प्रमाण खूप कमी करण्यात आले आहे.”

आपल्या 68 व्या वाढदिवसानिमित्त मोदी आपल्या मतदारसंघातील शाळेच्या विद्यार्थ्यांना भेट दिली होती, त्यांच्याशी बोलताना ते म्हणाले कधीही प्रश्न विचारण्यापासून भिऊ नका, निडर व्हा आणि ताठ उभे राहून पुढे चला. असा संदेशही त्यांनी दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here