Indian Railways च्या ऑफिशियल वेबसाईटवर त्यांनी गेल्या तीन वर्षात रेल्वे दुर्घटनेत बळी गेलेल्यांची आकडेवारी जाहीर केली आहे. वर्ष 2015 पासून ते 2017 पर्यंतची आकडेवारी वेबसाईटवर ऍड करण्यात आली आहे. त्यानुसार 2015-17 या कालावधीत एकूण 49, 790 लोकांचा बळी गेला आहे. यात आत्महत्या करणारे आणि अक्सिडेंट झालेले या सर्वांचा समावेश आहे.

रेल्वेच्या वेबसाईटवर रेल्वे झोन नुसार सुद्धा आकडेवारी जारी केली आहे. त्यातील सर्वात जास्त उत्तर रेल्वे झोन मध्ये 7908 लोकांचा मृत्यू झाला आहे, त्यापाठोपाठ दक्षिण रेल्वे झोन मध्ये 6149 लोकांचा तर पूर्वी रेल्वे झोन मध्ये 5670 लोकांचा रेल्वे दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. हे टॉप थ्री रेल्वे झोन आहेत. रेल्वेचे असे एकूण भारतात 16 रेल्वे झोन आहेत.

या सर्व रेल्वे झोनची मिळून एकूण आकडेवारी काढली असता गेल्या तीन वर्षात 49,790 लोकांचा रेल्वे दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. रेल्वेने या मृत्यूच्या कारणाबद्दल ही सांगितले आहे, त्यात रेल्वे च्या नियमांचे पालन न करणे, पादचारी पुलाचा वापर न करणे, प्लॅटफॉर्म बदलण्यासाठी ट्रॅक वरून चालत जाणे, मोबाईल फोनचा अतिवापर करत रेल्वेमध्ये चढणे-उतरणे, अशी अनेक कारणे वेबसाईटवर सांगितली आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here