योगगुरू रामदेव बाबा NDTV च्या पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, “जर सरकारने मान्यता दिली तर मी पेट्रोल-डिझेल 35-40 रु प्रति लिटर विकू शकतो.” तसेच पेट्रोल-डिझेल GST अंतर्गत घेण्यासाठी सुद्धा त्यांनी सुचवलं.

परंतु सरकार पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमती बाबत पूर्णपणे हरलेले असतांना रामदेव बाबा सारख्या भाजप समर्थकाने असे विधान करणे, लोकांना थोडे खटकणारे आहे. कारण रामदेवबाबा म्हणतात सरकारने जर मला करा मधून सूट दिली तर मी पेट्रोल-डिझेल 35-40 रुपयाला विकू शकतो, हे विधान आहेच खटकणारे. जरी सरकारने पूर्णपणे करातुन सवलत दिली तीही ठोक विक्रेत्यांचे कमिशन कापून तरी पेट्रोल ची किंमत ही दिल्लीमध्ये 41.48 रु पेक्षा कमी होऊ शकत नाही.

मग रामदेवबाबा 40 रुपयांपर्यंत कसे विकू शकतील?

तुम्हाला वाटेल 41.48 रुपयाला तर विकू शकतो ना, मग तस का नाही? कारण सरकार कधीच कोणत्याही कंपनीला किंवा ठोक विक्रेत्याला करातून पूर्णपणे सूट देऊ शकत नाही. कारण

  • तेल हे सरकारचं कर गोळाकरण्याचा महत्वाचा मार्ग आहे आणि त्यातच जर सरकारने सूट दिली तर सरकारचे उत्पन्न कमी होईल आणि जर सरकारचे उत्पन्न कमी झाले तर सरकारने सुरू केलेल्या योजना आणि देशविदेशातील पायभूत सोयीसुविधांसाठी चालू असलेले बांधकाम यांच्यासाठी पैश्यांची कमतरता निर्माण होईल. त्यामुळे सरकार करात कपात करू शकत नाही.
  • कर आकारणे हा सरकारचा हवा प्रदूषण नियंत्रणात आणण्याचा एक मार्ग आहे. कारण जर कर आकारणी होणार नसेल तर लोकांना पेट्रोल-डिझेल स्वस्तात मिळेल आणि त्यामुळे तेलाचा वापर साहजिकच वाढेल. आपल्याला माहीत आहे तेलाच्या किंमती खूप कमी झाल्या की आपणच गरज नसल्या ठिकाणी सुद्धा गाड्यांचा वापर करतो. तेलावर कर आकारला की आपोआपच ठोक विक्रेते तेल आवश्यक आहे तेवढंच खरेदी करतात. त्यामुळे तेलाची साठवनबाजी होण्याची शक्यता पण कमी होते.

पेट्रोल 40 रु प्रति लिटर या भावाने 2009 मध्ये लोकांना भेटत होते. त्यावेळी डॉलर च्या तुलनेत रुपयाची किंमत ही 1 $ = 50 ₹ एवढी होती आणि कच्च्या तेलाच्या किंमती ह्या 48-54 $ प्रति बॅरल एवढ्या होत्या.

मग तेलाच्या किंमती ह्या कधीच कमी होऊ शकत नाहीत का? तेलाच्या किंमती कमी होऊ शकतात पण तेंव्हाच जेंव्हा भारताचे तेलाच्या आयातीवरील अवलंबित्व लक्षणीयरित्या कमी होईल आणि आपण भारतातचं कच्च्या तेलाची निर्मितीसाठी सक्षम होऊ. पण ते खूप अवघड आहे, ही सत्य वस्तूस्थिती आपण समजली पाहिजे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here