संपूर्ण देशातील अनेक युनिव्हर्सिटीजमध्ये ‘नागरिकता दुरुस्ती कायदा’ म्हणजेच CAA विरोधात निदर्शने काढली जात आहेत. त्यापैकी चार मोठ्या युनिव्हर्सिटी मध्ये आंदोलनाने उग्र रूप घेतले आहे. दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामीया युनिव्हर्सिटीतील विद्यार्थ्यांनी सुद्धा CAA कायद्याला आपला विरोध दर्शवण्यासाठी रस्त्यावर उतरले होते. युनिव्हर्सिटी कॅम्पसमध्ये परिस्थिती हिंसक बनली होती. पोलिसांवर दगडफेक करण्यात येत होती, बसे आगीत जळून खाक झाल्या होत्या. त्यामुळे पोलिसांनी ही प्रत्युत्तर देत विद्यार्थ्यांवर टीअर गॅसचा वर्षाव केला, लाठीचार्ज केला. रस्ते, गल्ल्या प्रत्येक ठिकाणी आरडाओरडा ऐकू येऊ लागला होता. विद्यार्थ्यांचं सुद्धा या निदर्शनात रक्त वाहू गेलं आहे.

या दरम्यान अनेक व्हिडीओ व्हायरल करण्यात आले, अनेक लेख लिहिले गेले. सोमवारी सुद्धा इंडिया गेटवर निदर्शने काढण्यात आली होती. पोलिसांची दादागिरी आणि CAA ला विरोध करण्यासाठी लोक इंडिया गेटवर जमा झाले होते. येथेच काही शीख बांधवांनी मानवतेचा इशारा देत, कडाक्याच्या थंडीत सर्वांसाठी गरम गरम चहाची सोय केली.

ट्विटर वर हे चहा पाजत असतानाचे हे व्हिडीओ खूपच व्हायरल होत आहेत. खऱ्या अर्थाने सिंग इज किंग असल्याचं त्यांनी दाखवून दिलं. आंदोलन कर्त्यांसाठी चहा लंगर या शीख भावांनी सुरू केलं आणि संपूर्ण भारत वासीयांची मने जिंकली.

त्याचबरोबर असेही ट्विट्स केले जात आहेत की, ज्या विद्यार्थ्यांना पोलीस प्रशासनाच्या बंदोबस्तामुळे खाण्याचे हाल होत आहेत, आशा सर्वांसाठी गुरुद्वारांचे दरवाजे उघडले जावे, असे अनेक शीख बांधव स्वतः म्हणत आहेत.