उत्तर प्रदेश पोलीसांनी फोन वरून एफआयआर दाखल करणारी, अशा प्रकारची पहिली योजना जारी केली आहे. या योजनेत कोणताही सामान्य व्यक्ती नियमित गुन्ह्यासाठी फोन वरून FIR दाखल करू शकतो, त्याला पोलीस स्टेशन मध्ये जाण्याची गरज नाही.

FIR म्हणजे First Investigation Report म्हणजे गुन्ह्या संबंधीची पहिली माहिती यात दाखल केली जाते. FIR हे लिखित दस्तावेज असतं जे की पोलिसांकडे असतं. कोणताही व्यक्ती कोणत्याही गुन्ह्याबद्दल लिखित किंवा तोंडी FIR नोंदवू शकतो. IPC च्या कलम 154, 1973 मध्ये FIR ची व्याख्या करण्यात आली आहे.

आपल्याला माहीत असेल आता FIR दाखल करण्याच्या दोन पद्धती आहेत. 1) e-FIR आणि 2) Dial-FIR

● Dial-FIR योजनेबद्दल माहिती –

  1. ही योजना संपूर्ण उत्तर प्रदेशमध्ये लागू करण्यात आली असून, या अगोदर प्रायोगिक तत्वावर दोन महिन्यासाठी ही योजना गाझियाबाद येथे यशस्वीरित्या राबवण्यात आली. योजनेच्या यशामुळेच संपूर्ण उत्तर प्रदेश मध्ये ही योजना लागू करण्यात आली आहे.
  2. या योजनेत आता नियमित गुन्हे जसे चोरी, भांडण, कोणी हरवणे अशा गुन्ह्याबद्दल FIR दाखल करू शकता. तुम्हाला FIR दाखल करण्यासाठी पोलिस स्टेशनमध्ये जाण्याची गरज नाही. फक्त एक कॉल वर FIR दाखल करू शकता.
  3. या व्यतिरिक्त उत्तर प्रदेश पोलीस दहशतवाद विरोधी कारवायांना अंजाम देण्यासाठी 100 नवीन कमांडोंना ट्रेनिंग देत आहे.
  4. गुन्हेगारांना आणि गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने ऑनलाइन Dossier of Criminals पण तयार करण्यात आले आहे. या DoC मध्ये जवळपास 1 लाख लहान मोठ्या गुन्हेगारांचा लेखाजोखा असणार आहे. जेल विभागांकडून हा लेखाजोखा मिळवला जाईल.
  5. या योजने अंतर्गत तपास करणाऱ्या पोलिसांना वेगवेगळ्या जिल्ह्यात जवळपास 22000 नवीन i-pads लवकरात लवकर देण्यात येतील. यामुळे पोलिसांना लवकरात लवकर गुन्ह्याचा तपास करण्यास आणि गुन्हेगारापर्यंत लवकर पोहचण्यास मदत होईल.
  6. Dossier of Criminals तयार करणार उत्तर प्रदेश सरकार हे भारतातील दुसरं सरकार आहे या अगोदर पंजाब सरकारने DoC तयार केलं होतं. पण Dial-FIR मात्र पहिल्यांदा उत्तर प्रदेशमध्येच राबवली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here