सोमवारी केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजे Union Public Service Commission (UPSC) यांची कार्यालयीन वेबसाईट हॅक करण्यात आली होती. त्याची ऑफिशिअल वेबसाईट हि (http://www.upsc.gov.in) अशी आहे,  सोमवारी उशिरा केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वेबसाईटवर सुप्रसिद्ध कार्टून डोरेमॉन याचे चित्र आणि त्याच्यासोबत बदामाचे चित्र आणि त्यावर Doraemon!!! Pick up the call, असं लिहलं होतं. हे चित्र वेबसाईटच्या पेजवर दिसत होतं आणि त्याच्याबरोबर एक पार्श्वसंगीत(बॅकग्राऊंड म्युझिक) पण वाजत होतं. त्या पेजच्या शेवटी म्हणजे खालच्या बाजूला I. M. STEWPEED असंही लिहिण्यात आलं होतं. हॅकिंग नंतर ती लगेचच ती वेबसाईट रिस्टोर करण्यात आली, परंतु यावरून हे दिसून येतं की भारत सरकारच्या महत्वाच्या आयोगाची जर वेबसाईट अशी हॅक होत असेल तर मग सरकारच्या इतर कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उठणे साहजिकच आहे.

Doraemon हे जगप्रसिद्ध जपानी कार्टून आहे, यात Doraemon हा नेहमी Nobita या पात्राला वेगवेगळ्या गॅजेट्सच्या मदतीने मदत करत असतो.

सरकारी वेबसाईट हॅक होण्याची ही पहिली वेळ नाही, या अगोदर सुद्धा सरकारी वेबसाईट हॅक झाल्या आहेत. मागच्या एप्रिल महिन्यात न्यायमूर्ती लोया यांच्या मृत्यूबाबतची स्वतंत्र चौकशीची मागणी करण्यात आली होती तेंव्हा सुद्धा सुप्रीम कोर्टाची वेबसाईट हॅक झाली होती. आणि त्याच महिन्यामध्ये संरक्षण मंत्रालयाची वेबसाईट सुद्धा हॅक करण्यात आली होती. वेबसाईट हॅक झाल्याचे लक्षात आल्यानंतर लगेचच त्या वेबसाईटना रिस्टोर करण्यात आले. सरकारी वेबसाइट सुरक्षित करण्यासाठी सरकार कोणते पाऊल उचलेल ते पाहण्याची गरज आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here