अरुणाचल प्रदेश मधील वेस्ट कमेंग जिल्ह्यातील दोन छोटयाशा गावातील गावकरी हे करोडपती झाले आहेत. भारत-चीन यांच्यातील 1962 च्या युद्धात या गावकऱ्यांनी ही जमीन भारतीय आर्मीला दान म्हणून दिली होती.

जवळपास 50 वर्षे अगोदर दान म्हणून दिलेल्या या जमिनीचा भारतीय आर्मीला खूप फायदा झाला. भारतीय आर्मीचे अनेक कॅम्प या ठिकाणी उभे केले गेले आहेत.

परंतु भारत सरकार, शेतकऱ्यांनी केलेल्या या मदतीस कधीही विसरणार नाही आणि सरकार गावकऱ्यांची ऋणी असेल असेही अरुणाचल सरकाने म्हटले. या गावकऱ्यांनी त्यावेळी सरकार कडून एकही पैसा न घेता भारतीय सैन्याला जी मदत केली ती अमूल्य आहे. त्यावेळेच्या परिस्थितीत गावकऱ्यांनी चक्क आपल्या जमिनी भारतीय सैन्यास मदत म्हणून दान करणे ही खूप मोठी गोष्ट होती.

त्यामुळे सरकाने आता या शेतकऱ्यांना त्यावेळी दान म्हणून दिलेल्या जमिनीचा योग्य मोबदला देण्याचे ठरवले आहे. दोन वेगवेगळ्या कार्यक्रमात मोबदल्याचे धनादेश गावकऱ्यांना देण्यात आले आहेत. या जमिनीचा मोबदला करोडोमधे असल्यामुळे हे लोक रात्रीतून करोडपती झाले. अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खंडू यांच्यातर्फे हेधनादेश गावकऱ्यांना वाटप करण्यात आले आहेत. आता पर्यंत 37.73 कोटी रुपये Tukpen आणि Singchung या दोन्ही गावात वाटण्यात आले आहेत.

Singchung गावातील ‘पाच’ शेतकऱ्यांना 24.56 कोटी रुपये तर Tukpen गावातील सात शेतकऱ्यांना 13.17 कोटी रुपये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वाटप करण्यात आले आहेत.

 मुख्यमंत्री पेमा खंडू यांनी ट्विट करून म्हटले कि, “पंतप्रधान मोदींच्या अरुणाचल प्रदेश विषयी असलेल्या प्रेमामुळेच हा मोबदला गावकऱ्यांना मिळू शकला आहे.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here