भारतीय लष्करातील अगदी मोठ्या अधिकाऱ्यांपासून ते लहान सैनिकापर्यंत सर्वांची हेअरस्टाईल ही सारखीच असते आणि ती एकदम लहान केस असलेली कट असते. फक्त भारतातच नाही तर अमेरिका, रशिया, चीन, पाकिस्तान, जर्मनी, कोरिया अशा सर्व देशातील सैनिकांची हेअरस्टाईल सुद्धा अशीच असते.

सैनिकांची हेअरस्टाईल अशी का असते :-

  • सैनिकांना बऱ्याच वेळा अति उष्ण तापमानात काम करावे लागते. अशा तापमानात जर सैनिकांच्या डोक्यावर जास्त केस असतील तर त्याचे डोके लवकर जास्त गरम होईल आणि केस कमी असतील तर त्याचे डोके थंड राहील.
  • शत्रूला मारण्यासाठी सैनिक निशाणा साधत असताना डोक्यावरील जास्त केस डोळ्यापुढे येण्याची शक्यता असते आणि त्यामुळे शत्रू वाचू शकतो आणि हे सर्व टाळण्यासाठी केस लहान ठेवले जातात.
  • सैनिकांना युद्धकाळात डोक्यावर हेल्मेट घालावा लागतो. जर त्यांच्या डोक्यावर जास्त केस असतील तर हेल्मेट त्यांच्या डोक्यावर व्यवस्थित बसणार नाही, त्यामुळे त्यांच्या जीवाला धोका होऊ शकतो.
  •  बऱ्याच वेळा सैनिकांना कित्येक दिवस अंघोळ करायला भेटत नाही, अशा वेळी जर त्यांच्या डोक्यावर जास्त केस असतील तर डोक्यात उवा-जंतू आणि इन्फेक्शनचे प्रमाण वाढू शकते.
  • सर्वात महत्वाचं कारण म्हणजे हे समानतेचे प्रतीक आहे, लष्करातील मोठ्या अधिकाऱ्यापासून लहान सैनिकांपर्यंत सर्व समान ध्येयासाठी काम करत आहेत. समानतेची जाणीव देते.
  • सर्वांमध्ये सारखेपणा, शिस्त, नीटनेटकेपणा राहण्यासाठी अशी केसांची कटिंग केली जाते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here