दिल्ली येथे स्थित असलेल्या राष्ट्रीय गांधी संग्रहालयात ‘महात्मा गांधीजींच्या’ ह्रदयाचे ठोके प्रेक्षकांना ऐकायला मिळणार आहेत, अशी माहिती संग्रहालयाचे निर्देशक ए.अन्नमलाई यांनी सांगितले.

तुम्हाला माहित असेलच की राष्ट्रीय गांधी संग्रहालय दिल्ली येथे गांधीजींच्या 150 व्या जयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात महात्मा गांधी यांच्या जीवनावर लिखित पुस्तकांचे प्रदर्शन, त्यांच्या अतिशय दुर्मिळ अशा छायाचित्रांचे प्रदर्शन, त्यांच्या भाषणाचे आणि लेखांचे प्रदर्शन तसेच जगभराला ‘अहिंसा आणि शांती’ वर चालण्यासाठी प्रेरित करणाऱ्या अनेक कार्यक्रमांचा समावेश आहे.

या संग्रहालयात महात्मा गांधीजींच्या ह्रदयाचे ठोके प्रेक्षकांना ऐकायला येईल, अशी माहिती संग्रहालयाचे निदेशक ए. अन्नमलाई यांनी सांगितले. हे ह्रदयाचे ठोके कृत्रिमरीत्या तयार केलेले आहेत. महात्मा गांधीजींच्या वेगवेगळ्या ठिकाणावरील सोर्सेस वरून त्यांच्या ECG रिपोर्टचे एकत्रिकरण करण्यात आले आणि त्या ECG रिपोर्ट वरून त्यांच्या ह्रदयाच्या ठोक्याची ऑडियो क्लिप तयार करण्यात आली आहे. लोकांसाठी हा अनुभव अतिशय रोमांचकारी असेल असा अंदाज वर्तवला जात आहे.

ए. अन्नमलाई यांनी आणखी पुढे म्हटले की गांधीजींच्या 150 व्या जयंती निमित्त ‘अहिंसा आणि विश्व शांती’ या थीमवर लोकांसाठी ‘डिजिटल मल्टिमीडिया किट‘ तयार करण्यात आलं आहे. लोकांना हे किट विकत घेता येईल. यात प्रामुख्याने एक पेन ड्राइव्ह तुम्हाला मिळेल. या पेन ड्राइव्ह मध्ये महात्मा गांधीजीं लिखित मूलभूत 20 पुस्तके आणि 10 गांधीजींवर लिहिलेली पुस्तके आहेत. तसेच ए. के. चेट्टीयार द्वारा काढलेलं गांधीजींचं वृत्तचित्र आणि गांधींचे 100 छायाचित्रे आणि गांधीजींच्या आश्रमाचा आभासी मुआयना ही तुम्हाला करायला मिळेल, म्हणजे आश्रमाचा व्हिडीओ क्लिप तुम्हाला पाहायला मिळेल. आशा गोष्टींनी हे डिजिटल मीडिया किट भरलेलं असेल.

अशा या रोमांचपूर्वक संग्रहालयात महात्मा गांधीजींच्या ह्रदयाचे ठोके ऐकायला मिळणार म्हणून प्रेक्षक उत्सुक आहेत.