भारतामध्ये लोकांचा सुरुवातीपासून सरकारवरती असा आरोप आहे की त्यांना सरकारी सेवा जसं रेशनकार्ड काढणे, ड्रायव्हिंग लायसन्स काढणे, जात प्रमाणपत्र काढणे इत्यादी ज्या सेवा आहेत, त्या मिळवायला बराच वेळ आणि पैसा खर्च व्हायचा. आता यावर मात करण्यासाठी दिल्ली सरकारने एक वेगळीच शक्कल लढवली आहे. आता दिल्ली सरकार घरपोच सरकारी सेवा पुरवणार आहे. यामध्ये तुम्हाला सरकारी कार्यलयच्या चकरा माराव्या लागणार नाहीत, तर सरकारी कर्मचारी तुमचं काम करायला स्वतः तुमच्या घरी येतील. यासाठी गरजूंना एका फोन नंबर वर कॉल करायचा आहे. कॉल केल्यानंतर सरकारी कर्मचारी तुमच्या घरी येऊन तुम्हाला पाहिजे ते मिळवून देतील. या सरकारी कर्मचाऱ्यांना ‘Mobile Sahayaks’ असं नाव देण्यात आलं आहे.

दिल्ली सरकारच्या म्हणण्यानुसार अशी सेवा पुरवणार जगातलं हे पहिलंच सरकार आहे. आता पर्यंत कोणत्याही पाश्चिमात्य किंवा पौर्वात्य देशांनी अशी सेवा कधीच पुरवली नाही.

या मोबाईल सहायकांकडे एक बायोमेट्रिक यंत्र आणि कॅमेरा दिला गेला असणार आहे, म्हणजे तुमचं कोणताही काम असो तुम्ही या सहायकांकडे तुमचे सर्व कागदपत्रे जमा करणे आवश्यक आहे.

सध्या वेगवेगळी प्रमाणपत्रे जसं जात प्रमाणपत्र, नवीन पाणी जोडणी घ्यायची असेल, रेशनकार्ड काढायचं असेल, RC मध्ये तुमचा पत्ता बदलायचा असेल अशा जवळपास 40 सेवा या योजनेत पहिल्या फेज मध्ये जारी केल्या आहेत. या 40 सेवा दिल्ली सरकारच्या वेगवेगळ्या सात विभाग कार्यालयातून पुरवल्या जाणार आहेत. ही सात कार्यालये म्हणजे 1) महसूल विभाग, 2) सामाज कल्याण विभाग, 3) परिवहन विभाग, 4) दिल्ली जल बोर्ड, 5) अन्न आणि पुरवठा विभाग, 6) कामगार विभाग आणि 7) SC/ST/OBC/ Minorities कल्याण विभाग, ही आहेत.

या आहेत पहिल्या फेज मधल्या 40 सेवा, दुसऱ्या फेज मध्ये आणखी बऱ्याच सेवा यात समाविष्ट होतील असा अंदाज आहे.

या सेवेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला म्हणजे दिल्ली रहिवासीयांना 1076 या नंबर वर कॉल करायचा आणि आपल्याला पाहिजे ती सेवा नोंदवायची आहे. सेवा नोंदविल्यानंतर हे मोबाईल सहाय्यक तुमच्या घरी येऊन तुमचं काम करून देणार आहेत आणि यासाठी तुमच्या कडून फक्त 50 रु क्षुल्लक फिस आकारली जाणार आहे. ही योजना सुरू झाल्यानंतर पहिल्याच दिवशी दिल्ली सरकारला जवळपास 20 हजार कॉल आले असल्याचंही माध्यमाद्वारे कळतंय.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here