2019 मध्ये होणाऱ्या निवडणुकांना लक्षात घेता, शनिवारी BJP च्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक सुरू झाली. या बैठकीमध्ये BJP च्या अनेक दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली. काल रविवारी पंतप्रधान मोदींनी या बैठकीला संबोधित केले. काल झालेल्या बैठकीत हे निश्चित करण्यात आलं की येणारी निवडणूक BJP चे सध्याचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री अमित शहा यांच्याच निदर्शनाखाली होणार आहे. अमित शहा यांचा कार्यकाल जानेवारी मध्ये पूर्ण होतो आहे.

घोष वाक्य –

2014 मध्ये झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीवेळी BJP घोष वाक्य ‘ अबकी बार, मोदी सरकार ‘ हे होते.

2019 मध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी BJP साठी नवीन घोष वाक्य तयार करण्यात आले आणि ते शनिवारी सर्वांच्या सहमतीने स्वीकारण्यात आले. ते घोष वाक्य, ‘अजेय भारत, अटल भाजप  इंग्रजी मध्ये ‘Ajey Bharat, Atal BJP ‘ हे आहे.

या बैठकीला संबोधित करताना अमित शहा म्हणाले की 2019 मध्ये BJP ला संपुर्ण बहुमत मिळणार असून 2014 पेक्षा सुद्धा जास्त जागा जिंकून BJP सरकार स्थापन करेल. 2019 च्या निवडणुकीसाठी व्यूहरचना तयार करण्यात आली असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

विरोधी पक्षांच्या महागटबंधनाबद्दल बोलताना अमित शहा म्हणाले कि, ‘महागटबंधन हे आभासी आहे, यामुळे BJP ला कुठलंच नुकसान होणार नाही.’ 2014 नंतर सर्व निवडणुकात महागटबंधनातील सर्व पक्ष सतत BJP विरुद्ध हारले आहेत. त्यामुळे महागटबंधन हे काँग्रेसचे व्हेंटिलेटर असल्याचे त्यांच्या बोलण्यावरून सूचित होते.

काँग्रेसवर टीका करताना अमित शहा म्हणाले की BJP नवीन भारत तयार करत आहे, तर काँग्रेस भारताचे तुकडे करत आहे, असा आरोप त्यांनी केला. काँग्रेस फक्त vote bank राजकारण करते आहे, असंही ते म्हणाले. काँग्रेस आणि त्यांचे मंत्री जनतेची दिशाभूल करत असल्याचंही त्यांनी म्हटलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here