Amit Shah

हैद्राबाद येथे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा, विजय लक्ष 2019 च्या कार्यक्रमात संबोधन करताना अमित शहा म्हणाले की, राहुल गांधी आम्हाला मागच्या साडे चार वर्षाचा हिशोब मागत आहेत. मी त्यांना सांगु इच्छितो की मी राहुल गांधींना हिशोब देणार नाही. कारण त्यांना हिशोब मागण्याचा काहीच अधिकार नाही. त्यांच्या चार पिढीने भारतावर राज्य केले तरीही गरिबांसाठी काहीच केले नाही. त्यामूळे मी त्यांना आमचा हिशोब सांगणार नाही, अस स्पष्टपणे शहा म्हणाले. एकीकडे पंतप्रधान मोदी मेक इन इंडिया प्रोग्राम राबवतात तर दुसरीकडे काँग्रेस महागटबंधन करून ब्रेक इन इंडिया हे प्रोग्राम राबवत आहे.

भाजपचे अध्यक्ष अमित शहा चंद्रशेखर राव यांच्यावर निशाणा साधत म्हणाले की, चंद्रशेखर राव हे असुदुद्दीन ओवैसीला घाबरतात. कारण 17 सप्टेंबर रोजी हैद्राबाद लिब्रेशन डे होता आणि तरीही तो येथे साजरा केला गेला नाही. परंतु जेंव्हा भाजपा सत्तेत येईल तेंव्हा मात्र हैद्राबाद लिब्रेशन डे पुन्हा साजरा करण्यात येईल. हैद्राबाद संस्थान ज्या दिवशी भारतात विलीन झाले तो दिवस हैद्राबाद लिब्रेशन डे म्हणून साजरा करण्यात येतो.

लोकांना संबोधित करताना शहा म्हणाले की, तेलंगणाच्या लोकांनी आपल्या देशासाठी खूप मोठे बलिदान दिले आहे. आणि हे चंद्रशेखर सरकार त्या दिलेल्या आहुत्याना आणि बलिदानाचा विसरत आहे. आणि म्हणूनच त्यांनी हैद्राबाद लिब्रेशन डे साजरा केला नाही. 2019 मधील निवडणुकांचा निकाल आताच तयार आहे, नरेंद्र मोदी हेच देशाचे पंतप्रधान होणार, हे निश्चित आहे.

शहा पुढे म्हणाले की, भारतीय जनता पक्षाचे हे सौभाग्य आहे की राष्ट्र आणि विचारधारेला समर्पित अशी तरुण पिढी आम्हाला लाभली आहे. त्यांनी युवा मोर्चाच्या कार्यकर्त्याना आवाहन केलं की ते घराघरात मोदी सरकारने केलेल्या कल्याणकारी योजना पोहचवाव्यात आणि आगामी निवडणुकांसाठी एक पक्का बेस तयार करावा, तसेच वंशवाद आणि घाणेरडे/ तुष्टीकरणाचे राजकारण करणाऱ्या पक्षांना दुर्बीण घेऊन शोधावे लागावे असे हाल त्यांचे व्हावेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here