माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची स्थिती अतिशय नाजूक होती. एम्सने जारी केलेल्या वैद्यकीय बुलेटिनुसार, त्यांची स्थिती गेल्या 24 तासात खूपच बिघडली होती. त्याआधी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, पीयूष गोयल आणि मीनाक्षी अटलजींना भेटण्यासाठी एम्समध्ये गेले होते, आज राजनाथसिंह, लालकृष्ण आडवाणी हेदेखील अटलजींना भेटण्यासाठी गेले होते. देशाचे माजी पंतप्रधान व भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांचे दिल्लीतील एम्समध्ये संध्याकाळी 5:05 वाजता निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते आणि त्यांना गेल्या 9 आठवड्या पूर्वी एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. बुधवार पासून त्यांना लाइफ सपोर्ट सिस्टमवर ठेवण्यात आले होते.

 

देशाच्या इतिहासातील एक उत्तम पंतप्रधान अशी अटलजींची ओळख होती, अटल बिहारी वाजपेयी यांना भावपूर्ण श्रद्धांजली.