shriram statue

गुजरात मध्ये लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेलांच्या भव्य पुतळ्याच्या शुभारंभानंतर आता उत्तर प्रदेश मध्ये योगी सरकार श्रीरामाच्या पुतळ्याच्या उभारणीसाठी तैयारी दर्शवत आहे. यासंदर्भात उत्तर प्रदेश सरकारने राम सुतार यांच्याकडे चौकशी ही केली आहे. राम सुतार यांनी दिलेल्या एका इंटरव्हीव्यु मध्ये ही माहिती सांगितली. राम सुतार यांनी रामाच्या पुतळ्याचे डिझाइन सुद्धा उत्तर प्रदेश सरकारला पाठवले होते, परंतु अजून तरी ते डिझाइन पास होऊन राम सुतार यांच्याकडे आलं नाही. परंतु यावरून हे स्पष्ट दिसून येतंय की, उत्तर प्रदेश सरकार सुद्धा रामाचा भव्य पुतळा उभारण्यासाठी उत्सुक आहे.

अयोध्येत दिवाळीच्या औचित्याने दिपमहोत्सव साजरा करण्यात येणार आहे. त्या ठिकाणी योगी आदित्यनाथ ही उपस्थित राहणार आहेत. असं म्हटलं जातं आहे की या महोत्सवाचे लक्ष साधून मोठे एलान केले जातील, कारण मागच्या काही दिवसांमध्ये योगी आदित्यनाथ म्हणत होते की लवकरच तुम्हाला ‘अच्छी खबर’ ऐकायला मिळणार आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पुतळा हा 151 मीटर उंच असेल आणि तो 51 मीटर उंच प्लॅटफॉर्म वर उभारण्यात येईल. म्हणून स्मारकाची एकूण उंची 202 मीटर इतकी असेल.

परंतु राम सुतार यांनी उंची अजून फिक्स नसल्याच म्हटलं आहे. पण पुतळ्याची उंची 100 -150 मीटर एवढ्याच उंची पर्यंत असेल हे मात्र त्यांनी निश्चित सांगितलं. उत्तर प्रदेश सरकारने रामाच्या पुतळ्याच्या उभारणीच काम हाती घेणं हे अनेकांना राजकीय पाऊल वाटत आहे. येणाऱ्या निवडणुकीला लक्षात ठेवून या सरकाने हे पाऊल उचलल्याचे म्हटले जात आहे. उत्तर प्रदेश सरकार नेहमीच हिंदुत्वाचा उपयोग करून राजकारण करीत आलेली आहे. मागच्या आठवड्यात योगी सरकारने सांगितले होते की तुम्हाला ‘अच्छी खबर’ लवकरच सांगितली जाईल, ती अच्छी खबर हीच आहे.

या पुतळ्याच्या उभारणीसाठी अयोध्येत जिल्हा प्रशासनाने रामकथा म्युझियम जवळ जागा बघितली होती, पण ती जागा आता वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. त्यामुळे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार क्वीन ह्यू मेमोरियल जवळ चार हेक्टर जागा आहे, त्याठिकाणी रामाचा पुतळा उभारला जाऊ शकतो. योगी आदित्यनाथ अयोध्येच्या भेटीत त्या जागेला भेटही देऊ शकतात.

याबरोबरच फैजाबादच्या नाम बदलाचे सुद्धा एलान केले जाऊ शकते. कारण विश्व हिंदू परिषदेकडून बऱ्याच दिवसांपासून फैजाबादचे नाव बदलून ‘श्री अयोध्या’ करावे अशी मागणी होतं आहे. तसेच आणखी काही गट आहेत, जे फैजाबादचे नामकरण करू इच्छितात पण त्यांना फैजाबादचे नाव ‘साकेत‘ ठेवायचे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here