शिवसेना संस्थापक, हिंदुहृदयसम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावरील चित्रपट लवकरच प्रदर्शित होत आहे. तो चित्रपट ज्या दिवशी प्रदर्शित होत आहे, त्या दिवशी जर दुसरा कोणता चित्रपट रिलीज झाला तर त्यांना शिवसेना स्टाईलने धडा शिकवण्यात येईल, अशी चेतावणी शिवसेना पक्ष कार्यकर्त्यांनी दिली आहे.

शिवसेनेच्या एका स्थानिक नेत्याने गुरुवारी अशी चेतावणी दिली आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या जीवनावर प्रदर्शित होत असलेल्या चित्रपटाच्या रिलीज तारखेला दुसरा कोणताही चित्रपट रिलीज होऊ दिला जाणार नाही, अशा स्पष्ट शब्दात त्यांनी चेतावणी दिली आहे.

शिवसेनेनेमात्र त्या स्थानीय नेत्यांपासून स्वतःला दूर ठेवलं आहे. शिवसेनेशी संबंधित चित्रपट कर्मचाऱ्यांची जी ‘ चित्रपट सेना ‘ आहे, त्याचे सचिव श्री बाळा लोकरे यांनी सोशल मिडियाद्वारे हे कळवले आहे, बाळासाहेब ठाकरे चित्रपट रिलीज होणाऱ्या दिवशी दुसरा कोणताही चित्रपट रिलीज होणार नाही. त्यामुळे 25 जानेवारी ला दुसरा कोणताच चित्रपट रिलीज होणार नाही.

जर कोणी त्या दिवशी चित्रपट रिलीज करण्याचा प्रयत्न केला तर त्याला शिवसेनेच्या रोषाला सामोरं जावं लागेल. मग त्याला शिवसेनेच्या स्टाईल मध्ये धडा शिकवण्यात येईल. चित्रपट निर्माते संजय राऊत म्हणतात की लोकारे हे पक्षाच्या वतीने बोलत नव्हते. ते त्यांचा वयक्तिक विचार मांडत होते. शिवसेना कार्यकर्त्यांचा तो वयक्तिक विचार होता, ते पक्षाचं मत नव्हतं, असं ते म्हणाले.

‘बाळासाहेब ठाकरे’ चित्रपटासाठी लोकं गेल्या वर्षभरापासून वाट बघत आहेत. लोकांना विशेष करून तरुणांना त्या अद्वितीय नेत्याच्या जीवणाबद्दल जाणून घेयाची खूप इच्छा आहे. त्यामुळे चित्रपटाचं क्रेझ सध्या खूप आहे. त्या चित्रपटाच्या ट्रेलर ने तर सोशल मीडियावर हंगामा घातला होता. या चित्रपटासाठी शिवसेना पक्ष नेते राऊत यांना खूप खूप शुभेच्छा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here