RBI चे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी आपल्या गव्हर्नर पदाचा राजीनामा दिला आहे. राजीनाम्यात त्यांनी राजीनाम्याचे कारण वयक्तिक असल्याचे नमूद करून सहकाऱ्यांचे आभार मानले. त्यांचा कार्यकाळ अजून जवळजवळ वर्षभर होता.

उर्जित पटेल यांनी आज आपल्या गव्हर्नर पदाचा राजीनामा देऊन टाकल्यानंतर माजी वित्त सचिव हसमुख आधिया हे RBI चे पुढील गव्हर्नर होणार असल्याची अफवा पसरली आहे. हसमुख आधिया यांचं नाव अपुऱ्या माहिती वरून सांगण्यात आलं होतं. त्यामुळे अजून तरी हसमुख आधिया गव्हर्नर होणार नाहीत. ती एक अफवा होती. त्यांच्या शिक्षणाचा आणि ज्ञानाचा विचार करता ते गव्हर्नर पदाच्या स्थानी सहज विराजमान होऊ शकतात आणि त्यामुळे या अफवेला पंख फुटले.

1981 च्या कॅडर मधील आधिया हे भारतीय प्रशासकीय अधिकारी सेवेतील ऑफिसर होते. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर हसमुख आधिया यांची वित्तीय सेवा विभागाचे सचिव म्हणून नेमणूक करण्यात आली होती. नरेंद्र मोदींचे आणि अरुण जेटलींचे अतिशय जवळचे अधिकारी म्हणून यांची ओळख आहे. ते 30 नोव्हेंबर 2018 रोजी रिटायर झाले आहेत.

हसमुख आधिया हे केंद्रीय महसूल सचिव आणि केंद्रीय वित्तीय सचिव या महत्त्वाच्या पदावर कार्यरत होते. त्यामुळे हसमुख अधियाच पुढील गव्हर्नर असल्याच्या बातमीला बढावा मिळतो. उर्जित पटेल यांनी सोमवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. 1990 नंतर आपली टर्म संपण्यापूर्वी राजीनामा देणारे उर्जित पटेल हे पहिलेच गव्हर्नर आहेत. उर्जित पटेल यांच्या कार्यकाळ सप्टेंबर 2019 मध्ये संपणार होता, पण त्या आधीच त्यांनी राजीनामा दिला.

उर्जित पटेल यांनी आपल्या राजीनाम्यात आपल्या राजीनाम्याचे कारण वयक्तिक सांगितले आहे आणि ते या पदावरून पायउतार झाले. ते लिहीतात,” माझ्या वयक्तिक कारणामुळे मी या पदावरून या क्षणी पायउतार होत आहे. RBI चा गव्हर्नर म्हणून काम करणे। ही गोष्टच मुळात अभिमानाची आणि माझा सन्मान वाढवणारी आहे. RBI च्या स्टाफ आणि अधिकाऱ्यांच्या सपोर्ट मुळेच मी या पदावर चांगल्या पद्धतीने काम करू शकलो. RBI ने माझ्या काळात जी काही कामगिरी करून दाखवली आहे, त्याच सर्व श्रेय माझ्या सहकार्यांना आणि RBI च्या डायरेक्टर्सना मी देऊ इच्छितो. त्यांच्या शिवाय मी काहीच करू शकलो नसतो.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here