संपूर्ण देशात आज ७२ वा स्वातंत्र्य दिवस मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करण्यात आले. मोदी आज पाचव्यांदा लाल किल्ल्यावरून देशाला संभोधित  करत आहेत. २०१९ च्या निवडणुकांपूर्वी मोदींचे हे शेवटचे भाषण होते. आपल्या भाषणात त्यांनी देशात राबवल्या जाणाऱ्या योजना, विकास आणि जगातली भारताची बदललेली प्रतिमा यावर प्रकाश टाकला व त्यांनी केलेल्या कामाचा आढावा घेतला व नवीन काही योजना बाबत माहिती दिली.

नरेंद्र मोदींच्या भाषांतील काही ठळक मुद्दे.

 • देशातल्या मुलींनी भारताची किर्ती सातासमुद्रापार पोहचवली आहे. व तसेच चंदपूरमधील एव्हरेस्ट शिखर सर केलेल्या मुलांचे मोदींनी कौतुक केले.
 • तीन महिला सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश झाल्या ही भारतासाठी गौरवाची बाब आहे या शब्दांतून त्यांचे कौतुक केले.
 • ओबीसी आयोगाला संविधानिक दर्जा देण्यात आला आहे.
 •  जागतिक अर्थव्यवस्थेत भारत हा सहाव्या स्थानावर विराजमान झाला आहे. जगातील अर्थतज्ज्ञकडून भारतीय अर्थव्यवस्थेचे कौतुक सुरु आहे.
 • जीएसटीमुळे देशातील व्यापाऱ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला आहे.
 • बँकिंग सेक्टरमध्ये दिवाळखोरीचा कायदा होत नव्हता तो आम्ही केला.
 • भारत मल्टी बिलियन डॉलरच्या गुंतवणुकीचे केंद्र बनला आहे.
 • शेतकऱ्यांचे उत्पन्न आम्ही दीडपट वाढवलं आहे, प्रत्येक गावात वीज पोहचविण्याचं काम केलं आहे. गावागावात शेतकऱ्यांकडून रेकॉर्डब्रेक ट्रॅक्टर्सची खरेदी सुरू झाली आहे.
 • देशातील छोट्या गावांमध्ये, छोट्या शहरांमध्ये स्टार्टपची कामे सुरू झाली आहेत. ज्याना दिल्ली खूप दूर वाटत होती आज ते दिल्लीच्या दारापर्यंत येऊन पोहोचले आहेत.
 • मुद्रा लोनच्या माध्यमातून देशातील अनेक तरुणांना रोजगार उपलब्ध झाला आहे व भारताच्या पारपत्रा (पासपोर्ट) ची ताकद वाढली आहे असे त्यावेळी ते म्हणाले.
 • देशातील प्रत्येक गावात इंटरनेट सेवा देणं सोपं झालं आहे.
 • सर्जिकल स्ट्राइकने शत्रूला धडा शिकवला.
 • चालू काळात ९० हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार रोखण्यात सरकार यशस्वी झालं आहे.
 • कृषी क्षेत्रात नवीन तंत्रज्ञान आणण्याचा आमचा प्रयत्न राहील असे ते म्हणाले.
 • गेल्या ४ वर्षात शौचालय बनविण्याचे सर्वात मोठे काम झाले व स्वच्छता अभियानामुळे ३ लाख गरीब मुलांची मृत्यूपासून सुटका झाली आहे. जागतिक आरोग्य संघटना (WHO) च्या मते भारत हा स्वछ देश झाला आहे. भविष्यात प्रत्येक भारतीयाला मोफत आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्येचे अवाहन मोदींनी केले.
 • २५ ऑगस्ट पासून जनारोग्य अभियानाला सुरुवात.
 • २०१३ पर्येंत टॅक्स भरणाऱयांची संख्या ४ कोटींचं होती ती आता ७.७५ कोटी पर्यंत झाली आहे.
 • बलात्कार करणाऱ्याला फाशीच्या शिक्षेची भिती वाटायला हवी. त्यामुळे राजस्थान, मध्य प्रदेशमधील बलात्कारातील दोषींना त्वरित फाशीची शिक्षा देण्यात आली.
 • यावेळी त्यानी तेहेरी तालकाबाबत बोलले, तिहेरी तलाकच्या कुकर्मामुळे मुस्लिम मुलींचे आयुष्य उद्धवस्त झाले, मुस्लिम महिलांना न्याय मिळवून आश्वासन त्यांनी केले.
 • त्रिपुरा आणि मेघालय AFSPA तून मुक्त झाले आहेत व तसेच नक्षलवादी हिंसेमुळे प्रभावित झालेल्या जिल्ह्यांची संख्या घटली असून ती ९० झाली असल्याचे ते म्हणाले.
 • वाजपेयीजींनी आम्हाला जम्मू-काश्मीरबाबत नवीन मार्ग दाखविला आहे. आम्ही गळाभेट घेऊन काश्मीरमधील देशभक्तांना सोबत घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न करणार आहोत, मी माझ्या देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी प्रचंड उत्सुक आहे, हा देश आता थांबणार नाही, कोणासमोरही झुकणार नाही.