Independence Day 2018: ७२ व्या स्वांतत्रदिनानिमित्त देशभरात उत्साहाचे वातावरण असून दिल्लीतील लाल किल्ला येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर मोदींनी देशाला संबोधित केले. मोदी सरकारचा या टर्ममधील हा शेवटचा स्वातंत्र्यदिनाचा सोहळा असून भाषणात त्यांनी मोदी सरकार आणि यूपीए सरकारच्या कामकाजाची तुलना केली.

दिल्लीत लाल किल्ला येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ध्वजारोहण केले. यानंतर त्यांनी देशवासियांना संबोधित केले. देशवासियांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देत त्यांनी भाषणाला सुरुवात केली.

लाल किल्ल्यावर येण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजघाट येथे जाऊन महात्मा गांधी यांच्या समाधीचे दर्शन घेतले.

लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजारोहण

आदिवासी मुलांनी एव्हरेस्टवर तिरंगा फडकवून देशाची शान वाढवली: नरेंद्र मोदी

देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी बलिदान देणाऱ्या वीरांना मी नमन करतो: मोदी

आज देशाकडे आत्मविश्वास आहे. स्वप्न पूर्ण करण्यासाठी अथक परिश्रम करत देश यशाचे शिखर गाठत आहे. आजचा दिवस देशात एक नवीन उत्साह घेऊन आला आहे: मोदी

संसदेचे यंदाचे पावसाळी अधिवेशन सामाजिक न्यायासाठी समर्पित होते. दलित, मागासवर्गीय, महिलांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी संसदेने पावले उचलली

२०१४ मध्ये जनतेने देश घडवण्याच्या दिशेने पाऊल टाकले. देशातील १२५ कोटी जनता म्हणजे टीम इंडिया.

२०१३ च्या वेगाने काम केले असते गॅस सिलिंडर घराघरात पोहोचवण्यासाठी तसेच घराघरात शौचालये बांधण्यासाठी आणखी १०० वर्षे लागली असती. मोदींकडून भाजपा सरकार आणि काँग्रेस सरकारच्या कामाची तुलना

जगातील सहावी सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून भारताने नाव नोंदवले आहे. याचा प्रत्येक भारतीयाला अभिमान

जीएसटी सर्वांनाच हवे होते: मोदी

पूर्वी ईशान्य भारतातून वीज नाही, लोक रस्त्यावर अशा स्वरुपाच्या बातम्या यायच्या. पण आता काळ बदलला आहे. आता तिथे विकास कामे होत असून स्थानिकांना रोजगार मिळू लागला आहे. तरुण स्वत:चे व्यवसाय सुरु करत आहेत.

१०० हून अधिक उपग्रह अंतराळात सोडून भारताने जगाचे लक्ष वेधले. अंतराळ क्षेत्रातील वाटचाल लक्षणीय असून आगामी वर्षांमध्ये अंतराळात मानवाला पाठवणारा भारत चौथा देश ठरणार आहे.

देश तोच आहे, जमीन, आकाश, समुद्र, सरकारी कार्यालय देखील तेच आहे. निर्णय घेणारी प्रशासकीय यंत्रणाही तीच आहे. गेल्या चार वर्षात देशाने बदल अनुभवला आहे.

कृषी क्षेत्रात बदल घडवण्यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न सुरु असून शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय सरकारने घेतले आहेत. २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार

देशातील १३ कोटी लोकांना मुद्रा कर्ज देण्यात आले असून यातील ४ कोटी लोकांनी पहिल्यांदाच कर्ज घेतले आहे. यातून देशातील बदल दिसून येतो.

२५ सप्टेंबरपासून पंतप्रधान आरोग्य अभियानाला सुरुवात होईल. देशातील गरीब जनतेला चांगल्या आरोग्य सेवा मिळणे ही काळाची गरज

देशातील विविध योजना या करदात्यांच्या पैशांमधून राबवल्या जातात. या योजनांचे श्रेय हे सरकारचे नव्हे तर प्रामाणिकपणे कर भरणाऱ्या करदात्यांना.

काळा पैसा व भ्रष्टाचाऱ्यांना माफ करणार नाही, त्यांना शिक्षा झालीच पाहिजे, भ्रष्ट अधिकाऱ्यांवर आता कठोर कारवाई केली जाते. देशातील दलालांचे दुकानही बंद पाडले.

जम्मू- काश्मीरमध्ये गोळीच्या नव्हे तर गळाभेट घेऊन आम्ही पुढे जाऊ इच्छितो. आगामी काळात तेथील ग्रामस्थांनाही महत्त्वाचे अधिकार मिळणार, तिथे पंचायत तसेच महापालिका निवडणुका होतील यासाठी आमचे प्रयत्न सुरु.

तिहेरी तलाकमुळे अनेक महिलांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले असून आम्ही कायदा करत आहोत, मात्र काही लोक त्याला विरोध करत आहेत. मी मुस्लीम महिलांना आश्वासन देतो की हा कायदा येणारच

बलात्कार पीडित मुलीला ज्या त्रासाचा सामना करावा लागतो त्या वेदना मी समजू शकतो. देशाला या राक्षसीवृत्तीतून मुक्त करायचे आहे.

‘प्रत्येक भारतीय नागरिकांचे स्वतःचे घर, प्रत्येक भारतीय घरामध्ये वीज जोडणी, प्रत्येक भारतीयचे किचन धूर मुक्त, प्रत्येक भारतीय घराच्या गरजेनुसार पाणी उपलब्ध करू. प्रत्येक भारतीय इंटरनेटच्या दुनियाला जोडून राहावे. प्रत्येक भारतीय घरात शौचालय, प्रत्येक भारतीय आपल्या हावे त्या क्षेत्रासाठी कौशल्य प्राप्त करू शकले, प्रत्येक भारतीयाला चांगले आणि परवडणारे आरोग्यसेवा उपलब्ध करू, प्रत्येक भारतीयाला विमा संरक्षण मिळावे,’ असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

‘अशी अनेक देशं आहेत ज्यांनी विकासापासून आपल्यापुढे प्रगती केली आहे. मी प्रार्थना करतो की आपला देश त्यांच्या सर्वांपेक्षा पुढे जाईल. कुपोषण ही देशात मोठी समस्या आहे. माझ्या लोकांना जीवनमानाची गुणवत्ता देण्यास मी अधीर आहे,’असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

पंतप्रधान मोदींनी देशासाठी आपल्या आकांक्षा आणि दृष्टीबद्दल सांगितले.’जय हिंद’ भारत माता की जय ‘वंदे मातरम्’ च्या गोषणासह, पंतप्रधान मोदींनी लाल किल्ल्यावरून आपल्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणाचा समारोप केला.