माधुरी दिक्षीत 2019 ची लोकसभा निवडणूक लढवू शकते आणि भाजप कडून माधुरीला पुण्याच्या सीट वरून निवडणूक लढवण्याची ऑफर असल्याची बातमी आहे पसरली होती. 2019 च्या चुरशीच्या निवडणुकीत आता माधुरी दिक्षीत ही उतरणार होती निवडणुकीच्या मैदानातील मातीने आता माधुरी ही माखली जाणार होती यात काही वाद नव्हतं.

सूत्रांच्या माहितीनुसार, माधुरी दिक्षीतला 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप कडून उभारण्याची संधी देण्यात आली होती. पुण्यातील सीट वरून माधुरी उभी राहणार हाेती. भारतीय जनता पार्टीतील सूत्रांनी सांगितले की माधुरी दिक्षीत चे नाव पुण्यातून उभं राहण्यासाठी निवडण्यात आलं आहे. या वर्षीच्या जून मध्ये माधुरी दिक्षीतच्या घरी भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी भेट दिली होती. त्यावेळी माधुरी आणि अमित शहा यांच्यात चर्चा झाली. अमित शहा त्यावेळी भारतीय जनता पक्षाच्या ‘संपर्क फॉर समर्थन’ अभियानांतर्गत मुंबईत दाखल झाले होते. त्यावेळी यांची भेट झाली. अमित शहाने मोदी सरकारने मिळवलेल्या यशाची माहिती करून दिली.

राज्याच्या मोठ्या भाजप नेत्याने सांगितले की, भाजप मोठ्या गंभीरपणे माधुरी दिक्षीतला 2019 च्या लोकसभा निवडणुकीत उभं करण्याचा विचार करत आहे. भाजपला वाटत की माधुरीला पुणे सीट उत्तम असेल. भाजप म्हणत की, पक्ष अनेक लोकसभा सीट साठी उमेदवारांची नावे निश्चित करण्याच्या प्रयत्नात आहे. लवकरच काही सीटच्या नावांची यादी प्रदर्शित करण्यात येईल. माधुरी दिक्षीतच्या नावाचा पुण्यातून लोकसभा निवडणुकीसाठी गंभीरपणे विचार चालू आहे.

माधुरी दिक्षीत ही सध्या 51 वर्षांची आहे. तिने ‘तेजाब’, ‘हम आपके है कौन?’, ‘साजन’ आणि ‘देवदास’ सारख्या अनेक बॉलीवूड चित्रपटात काम केलं आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने पुण्यातील सीट काँग्रेस कडून हिसकावून घेतली होती. अनिल शिरोळे यांनी 3 लाखा पेक्षा जास्त मतांनी विजयी होतं, भाजपला मोठा विजय मिळवून दिला.

परंतु माधुरी ने मी कोणतीही निवडणूक लढवणार नसल्याचं स्पष्ट केलं. काल पत्रकारांशी बोलताना तिने सांगितले. लोकसभा निवडणुक ही नाही आणि विधानसभा निवडणूक ही नाही, कसलीही निवडणूक मी लढवणार नाही, असं स्पष्ट मत माधुरीने सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here