राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षांच्या युती बाबत बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरू होती. येत्या आगामी लोकसभा निवडणुकीत आणि विधानसभा निवडणुकीत हे दोन्ही पक्ष एकमेकांसोबत राहणार असल्याचं बोललं जातं होतं. परंतु यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी स्पष्ट मत व्यक्त केलं आहे. ‘मनसेची कार्यशैली आणि विचारधारा ही राष्ट्रवादी काँग्रेस पेक्षा खूप वेगळी आहे, त्यामुळे महाघाडीत राज ठाकरेंच्या मनसेला स्थान नाही,’ असे नवाब मलिक म्हणाले.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यात घेतलेल्या इंटरव्हीवमुळे, नुकतंच सोबत झालेल्या विमान प्रवासामुळे आणि तसेच दोघांच्या काही सारख्या विचारांमुळे अनेकांना असे वाटत होते की मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये युती होणार, पण तसे झाले नाही.

शरद पवार आणि राज ठाकरे हे दोघेही औरंगाबाद येथे एकाच हॉटेल मध्ये थांबले होते. राज ठाकरे हे ‘विदर्भ दौऱ्यावर’ होते तर शरद पवार हे बुलढण्यातील माजी मंत्री ‘भारत बोन्द्रे’ यांच्या नागरी सत्काराला गेले होते. त्यावेळी औरंगाबादवरून मुंबईला येताना दोघांनीही एकाच विमानातून प्रवास केला.

सर्वांना माहीतच आहे कि, राष्ट्रवादी काँग्रेसने काही दिवसांपूर्वी मनसेला महाघाडीत सामील करण्याचा प्रस्ताव काँग्रेस ला पाठवला होता, पण काँग्रेसने तो नामंजूर केला. मनसेला सामील करून घेण्याच्या मागणीला काँग्रेसचा केंद्रीय आणि राज्य स्तरावर विरोध होत असल्याचं काँग्रेसचे मुंबई प्रदेशाध्यक्ष संजय निरुपम यांनी स्पष्ट केल आहे. मनसेला महाघाडीचा भाग होता येणार नाही, असं संजय निरुपम यांनी स्पष्ट केलयं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here