प्रत्येक जिल्ह्यात नवीन मतदारांची नावे नोंदवण्याचे काम सुरू झाले आहे. ज्या लोकांचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त आहे, त्यांनी आपले नाव मतदार यादीत नोंदवणे महत्वाचे असते. 1 डिसेंबर पासून नवीन मतदार यादीसाठी नाव नोंदणीची प्रक्रिया सुरू झाली आहे. ही नवीन मतदार यादी 22 फेब्रुवारी रोजी जाहीर करण्यात येईल. अशा नवीन मतदारांना 2019 मधील एप्रिल – मे महिन्यात होणाऱ्या लोकसभा निडणुकीत मतदान करता येणार आहेत. निवडणूक आयोगाने फोटोयुक्त मतदार यादी साठी संक्षिप्त चरणबद्ध कार्यक्रम आयोजित केला आहे. 1 जानेवारी 2019 पर्यंत 18 वर्ष पूर्ण होणारे तरुणही या मतदार यादीसाठी आपलं नाव नोंदवू शकतात. या कार्यक्रमानुसार 26 डिसेंबर रोजी विस्तृत मतदार यादी जाहीर प्रकाशित केली जाईल. आणि त्यानंतर त्यावर कोणीही दावा, हक्क, आपत्ती घेऊ शकेल.

26 डिसेंबर ते 25 जानेवारी पर्यंत जिल्ह्यात सर्व मतदान केंद्रावर अविहित अधिकाऱ्यांना मतदार यादीत नाव नोंदणी, नाव कमी करणे, त्यावर आपत्ती ही सर्व कामे करावी लागणार आहे. मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी फॉर्म नंबर 6 भरून त्यासोबतच्या कागदपत्रांच्या छायाप्रति भरावे लागणार आहेत.

मतदान हा प्रत्येक भारतीय नागरिकाचा अधिकार आहे. तो अधिकार प्रत्येकाला बजावला पाहिजे. प्रत्येक नागरिकाचा मतदान करणे हे आद्य कर्तव्य आहे. त्यासाठी आधी कायद्यानुसार मतदानाचा हक्क 18 वर्ष पूर्ण झालेल्या व्यक्तींनाच आहे. त्यामुळे मतदार यादीत नाव नोंदवणे महत्वाचे आहे. भारताचे भविष्य तुमच्या मतदानावर अवलंबून आहे. त्यामुळे अखंड भारताच्या कल्याणासाठी सर्व प्रथम आपले नाव नोंदणी करणे महत्वाचे आहे, कारण त्यानंतरच आपण मतदान करू शकतो. मतदार यादीत नाव नोंदवल्या शिवाय मतदान करता येत नाही. त्यामुळे माझे सर्वांना आवाहन आहे की सर्व जणांनी आपापले भाऊ, बहीण, मुलगा, मुलगी, पुतण्या यांच्या नावाची नोंदणी करून घ्यावी. जर शेजारी असेल तर त्याला नाव नोंदणीसाठी सूचित करावे. भारताच्या उज्वल भविष्यासाठी सर्वांना जागरूक राहणे महत्वाचे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here