जानेवारी 2018 मध्ये केंद्रीय वित्त मंत्री ‘अरुण जेटली’ यांनी राजकीय पक्षांना देणगी देण्यासाठी इलेक्टोरल बॉंड जारी केले आहेत. आता राजकीय पक्षांना देणगी ही रोख रकमेत देता येणार नाही.

ध्येय –

● भारतातील राजकीय पक्षाच्या देणगी व्यवहारात पारदर्शकता आणि स्वच्छता येण्यासाठी.

● राजकीय पक्षाच्या देणगीकाराला स्वतःला ट्रॅक होण्यापासून आणि त्रास होण्याच्या भीतीपासून संरक्षण देण्याकरिता.

वैशिष्ट्य –

■ हे इलेक्टोरल बॉंड व्याजरहित असणार आहे.

■ हे बॉंड्स SBI बँकेच्या विशिष्ट शाखेतच मिळतील.

■ बॉंड्स मध्ये छुपे अल्फा नुमेरिक नंबर असून ते उघड्या डोळ्यांनी दिसणार नाहीत आणि त्यात वॉटर मार्क सुद्धा असणार आहे. विशेष म्हणजे बँकेकडे या छुप्या नंबर चा काहीच रेकॉर्ड राहणार नाही.

■ हे बॉंड्स ₹1000, ₹1 लाख, ₹10 लाख आणि ₹ 1 कोटी या प्रमाणातच घेता येऊ शकेल.

■ या बॉंड्स ची वैधता ही घेतल्यापासून 15 दिवस असणार आहे.

■ हे बॉंड्स फक्त नोंदणीकृत पक्षच आपल्या नियुक्त केलेल्या बँक अकाउंट मधूनच रोख रकमेत रूपांतर करू शकतो.

■ बॉंड विकत घेण्याचा कालावधी वर्षातील जानेवारी, एप्रिल, जुलै आणि ऑक्टोबर या महिन्यातीलच 10 दिवसच असेल.

■ फक्त जेव्हा सामान्य इलेक्शन असेल तेंव्हा मात्र जादा 30 दिवस हे बॉंड विकत घेण्यासाठी दिले जातील.