मंगळवारी एका डॉलरची किंमत ७० रुपयांवर जाऊन पोहोंचली आहे. आतापर्यंत डॉलरची किंमत एवढी कधीच झाली नव्हती. रुपयाने ७०.०९ असा आतापर्यंतचा सर्वात निच्च स्तर प्राप्त केला आहे. सकाळी रुपयाची किंमत ०. २% वाढली परंतु काही वेळातच ती पूर्णपणे घसरून ७० च्या पुढे गेली. सोमवारी १.१० ने रुपया घसरला, पाच वर्षा मधील एका दिवसाची सर्वात मोठी घसरण आहे. आर्थिक विषयक सचिव सुभाष चंद्र गर्ग यांनी म्हंटले कि रुपयांमध्ये घसरण बाहेरील कारणांमुळे आहे. तज्ज्ञांच्या मते व्यापारी युद्धामुळे भारतासोबत आशियातील सर्व देशांच्या चलनामध्ये घसरण झालेली आहे.

मार्च १९७३ मध्ये एका डॉलरचे मूल्य फक्त ७.१९ रुपये होते