शरद पवार आणि सिक्किमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते इतिहास अभ्यासक मंदार लवाटे यांच्या जुन्या पुणे शहराच्या फोटोंचे ‘पुणे एकेकाळी‘ या कॉफीटेबल पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या कार्यक्रमात अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चेला शरद पवारांनी पूर्ण विराम देत जाहीर केलं की, ते यापुढे कोणतीही निवडणूक लढवणार नाहीत. रविवारी या कार्यक्रमात बोलताना त्यांनी ही बातमी सर्वांना दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा माननीय श्री शरद पवारांच्या या विधानामुळे राजकीय क्षेत्रात चर्चेला उधाण आलं आहे.

या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात या दोन मोठ्या नेत्यांची ज्येष्ठ निवेदक सुधीर गाडगीळ यांनी मुलाखत घेतली. या मुलाखतीत शरद पवारांनी अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. श्रीनिवास पाटील राजकारणात कसे उतरले ? तसेच श्रीनिवास पाटील आणि शरद पवारांची मैत्री कशी घट्ट झाली ? या सर्व प्रश्नांची उत्तरे देताना शरद पवारांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.

“त्यावेळी काँग्रेसच्या बर्वेचा प्रचार करत असताना एका गृहस्थाने मला झापले होते. पुढे तेच गृहस्थ माझ्या सासूचे वडील निघाले,” असं शरद पवार म्हणाले. एवढे बोलताच उपस्थितात हसू फुटले. सर्वांना शरद पवारांच्या राजकीय कारकिर्दीला 50 वर्षे उलटून गेल्यामुळे एक वेगळाच आनंद वाटत होता.

विद्यार्थी दशेत असताना शरद पवार वेगवेगळ्या ठिकाणी पॅनेलच्या माध्यमातून अनेक निवडणूका त्यांनी लढविल्या होत्या आणि त्यातल्या बऱ्याचशा जिंकल्या ही होत्या. हे सांगत असताना त्यांनी पुणे शरहाराविषयीच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. याचवेळी निवेदक सुधीर गाडगीळ यांनी शरद पवारांना, या वेळेसच्या निवडणुकीत पुणे शहराच नेतृत्व करायला आवडेल का ? असा प्रश्न केला. त्यावेळी या प्रश्नाचं उत्तर देताना शरद पवार म्हणाले की यापुढे मी कोणतीही निवडणूक लढवणार नसल्याचं सांगितलं.

शरद पवारांच्या या निर्णयामुळे कार्यकर्त्यांत नाराजीचे वातावरण पसरले आहे. शरद पवारांचे चाहते, त्यांना आमचं नेतृत्व करा, अशी अपील करत आहेत. शरद पवार या पुढे एकही निवडणूक लढवणार नाहीत, याचा विचार करूनच लोकांना वाईट वाटत आहे. राजकारणातला धुरंधर असा औपचारिकरीत्या लोकांचं नेतृत्व करणं नाकारत असल्याने, राजकिय वर्तुळात चर्चा सत्र सुरू झाले आहे. या निर्णयामुळे शरद पवार राजकारणातून कायमचा संन्यास तर घेणार नाहीत ना, अशी भीती लोकांना आणि कार्यकर्त्यांना सतावत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here