sushma swaraj

केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज ह्या 2019 मध्ये होत असलेल्या भारताची सर्वात मोठी असलेली लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचं बातमी पुढे येत आहे. सुषमा स्वराज यांनी स्वतः ही म्हायती माध्यमांना दिली. मध्यप्रदेश मध्ये इंदूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती लोकांना सांगितली. भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांना या निर्णयाचा धक्का बसला. कारण त्यांचा प्रभावी वक्तृत्व असलेला नेता आता या पुढे ऐकायला मिळणार नाही, याची अनेकांना काहूर लागली आहे.

21 शतकात वावरत असताना मानवाचे सरासरी वय हे वाढत आहे. 66 वर्ष हे काही जास्त वय नाहीये. राजकारणात तर 66 वर्षे काहीच नाहीयेत. परंतु सुषमा स्वराज यांना काहीतरी वेगळंच वाटत आहे. त्यांनी याच वर्षात राजकारणापासून दूर होत असल्याचा इशारा दिला आहे. देशाच्या मोठ्या निवडणुकीला म्हणजेच लोकसभा निवडणुकीला आता काही महिनेच शिल्लक राहिले असताना, भापच्या या दिगग्ज नेत्यांकडून असे विधान अपेक्षित नव्हते. लोकांना या निर्णयाचा मोठा धक्का बसला आहे. भाजप नेत्यांमध्ये रिटायरमेंट नावाचा शब्दच नाही, असं अनेक काळापासून भाजप नेत्यांना संबोधले जाते, आणि ते तितकेच खरे देखील आहे. परंतु जे लोक सुषमा स्वराज यांना ओळखून आहेत, त्यांना मात्र या निर्णयाची अपेक्षा होती. कारण त्यांच्या आरोग्याबद्दल त्यांना माहिती होती.

या निर्णयाची अपेक्षा करणाऱ्यांमध्ये त्यांचे पती आणि माजी राज्यपाल स्वराज कौशल यांचाही समावेश होता. या घोषणेनंतर सुषमा स्वराज यांचे पती म्हणाले की, ” एका वेळेनंतर मिल्खा सिंगने सुद्धा धावणे सोडले होते, मग तुम्ही तर मागच्या 41 वर्षांपासून निवडणूका लढवत आहात. पुढच्या लोकसभा निवडणुक लढवत नसल्याचं सांगत त्यांनी एका स्वस्थ परंपरेला बढावा दिला आहे. असे निर्णय घेणारे नेते खूप कमी पाहायला मिळतात. अशांमध्ये पहिला नंबर लागतो तो नानाजी देशमुख यांचा. त्यांनी हे सांगून रिटायरमेंट घेतले की, राजकारण्यांना 60 वर्षांच्या वयापर्यंतच राजकारण केले पाहिजे आणि त्यानंतर त्यांनी सरळसरळ रिटायरमेंट घेतली पाहिजे.”

सुषमा स्वराज यांचं नुकतंच किडनी ट्रान्सप्लांटच ऑपरेशन करण्यात आलं आहे. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना धुळीत जाण्यापासून सक्त मनाई केली आहे. तरी देखील आपल्या खांद्यावरच्या जिम्मेदारीमुळे ते धुळीला थोडक्यात आपल्या स्वास्थ्याला जुमानत नाहीत. परंतु असं करणं खूप धोक्याचं आहे. ही गोष्ट त्यांच्या जीवावर बेतणारी आहे, त्यामुळे त्यांनी घेतलेलं निर्णय एकदम योग्य आहे. जीव असेल तरच लोकांसाठी तुम्ही कार्य करू शकता ना, आणि जर जीवच नसेल तर मग तुम्ही लोकांसाठी, समाजासाठी काय काम करू शकणार ?

सुषमा स्वराज वयाच्या 25 व्या वर्षी राजकारणात प्रवेश केला होता. खूपच लवकर राजकारणात त्यांनी प्रवेश केला होता आणि आता खूप लवकर रिटायरमेंट ही त्या घेत आहेत. त्यांना भारतीय राजकारणातला सुनील गावस्कर असे संबोधले जाते. सुषमा स्वराज ह्या ओजस्वी आणि प्रभावी वक्ता आहेत. त्या कुशल सांसद आहेत. त्यांचं एवढं वर्चस्व आहे की, अटल बिहारी वाजपेयी नंतर पंतप्रधान पदाच्या उमेदवारीसाठी सुषमा स्वराज आणि प्रमोद महाजन यांच नाव घेतलं जातं होतं.

2006 मध्ये प्रमोद महाजन यांच्या मृत्यू नंतर त्यांनाच पंतप्रधान पदाचे उमेदवार मानले जाऊ लागले होते. एवढं असून देखील सुषमा स्वराज पक्षाच्या अध्यक्ष सुद्धा कधी होऊ शकल्या नाहीत. याची दोन कारणं आहेत, एक सुषमा स्वराज पक्षाच्या कामापेक्षा देशाच्या म्हणजे संसदेच्या कामाला जास्त महत्त्व द्यायच्या आणि संसदेतील कामेच त्या करत असत. दुसरं, त्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पार्श्वभूमी नव्हती. त्या संघा सोबत जोडल्या गेल्या नव्हत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here