सर्वप्रथम आपण नक्षलवाद म्हणजे काय ते थोडक्यात समजून घेऊया. नक्षलवाद्यांना डावे- अतिरेकी असेही संबोधले जाते. ही भारत सरकार विरोधातील मोहीम पश्चिम बंगालच्या नक्सलबरी गावातून सुरू झाली त्यामुळे त्याला नक्षलवाद हे नाव पडले. हे लोक चीनच्या माओच्या विचारसरणीचं समर्थन करतात आणि जसं माओनी चीन मध्ये बदल घडवून आणला त्याप्रकारे ते भारतामध्ये सुध्दा बदल घडवून आणू इच्छितात.

2004 मध्ये Communist Party Of India (Maoist) यांनी एक दस्तावेज जारी केला होता. त्यामध्ये सुरुवातीला ‘Urban Perspective’ या शब्दाचा वापर केला होता. शहरी भागातून त्यांच्या मोहिमेसाठी नेते तयार करणे अथवा मिळवणे हा त्यांचा उद्देश होता. कारण त्यांना हे कळून चुकलंय की शिकलेल्या नेत्यांकडून जे यश मिळत ते आपल्याकडून कधीच मिळणार नाही. म्हणून हे डावे अतिरेकी शहरातल्या मोठं मोठ्या इन्स्टिट्यूट आणि विद्यापीठातून नेते मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. Communist Party Of India (Maoist) यांचं ध्येय भारत सरकारला पाडून भारतात आपली सत्ता स्थापन करणे, हे आहे. 2009 साली याच Communist Party Of India (Maoist) ला अतिरेकी संघटना म्हणून घोषित करण्यात आले आणि Unlawful Activities (Prevention) Act अंतर्गत या पार्टीवर बंदी घालण्यात आली.

ही पार्टी 2004 मध्ये Communist Party Of India (Marxist आणि Leninist) यांच्या एकत्रकारणातून तयार करण्यात आली होती. याला People’s War Group असेही म्हणतात. या संघटनेला भारत सरकारने विशेष करून UPA सरकारने संपूर्ण भारतात 22 जून 2009 पासून UAPA कायद्याअंतर्गत बंदी घातली आहे. काही माओवाद्यांना अतिरेकी प्रतिबंध कायद्याअंतर्गत अटक सुद्धा झाली आहे. या बंदी मुळे त्यांना मोर्चे काढणे, सभा घेणे, प्रदर्शने करता येत नाहीत. त्यांची बँक अकाउंट सुद्धा ताब्यात घेण्यात आले आहे.

या वर्षाच्या सुरुवातीला पुण्यात भीमा-कोरेगाव येथे ज्या दंगली झाल्या होत्या, त्यात पुणे पोलिसांनी पाच जणांना अटक केली होती. भीमा कोरेगाव येथे दर वर्षी भीमा कोरेगाव युद्धाच्या सन्मानार्थ वार्षिक संमेलन होते, या वर्षी हे 200 वे वार्षिक संमेलन होते. यात पकडलेल्या लोकांची विचारपूस करत आणि शोध घेत पोलिसांनी बऱ्याच जणांना अटक केली आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या माजी प्राध्यापिका रोना विल्सन यांना जुन 2018 मध्ये अटक केली होती. ऑगस्ट 2018 मध्ये पाच जणांना अटक केलेल्यापैकी वरवार राव, सुधा भारद्वाज आणि गौतम नवलाख हे होते. पोलिसांनी याना भीमा कोरेगाव प्रकरणासाठी जिम्मेदार मानत त्यांना अटक केली आहे. पोलिसांनी असही सांगितले की त्यांच्या कडून प्रधानमंत्र्यांना मारण्याच्या नियोजनाबाबतची चिठ्ठी बरामत करण्यात आली आहे.

शहरी नक्षलवादामध्ये शिक्षणतज्ज्ञ आणि कार्यकर्ते हे मानवी अधिकाराच्या पडद्याआड मोठ्या जनसंस्था चालवतात ज्या की माओवादी संघटनांना जोडलेल्या आहेत अशी माहिती UPA सरकारने Supreme Court त नोव्हेंबर 2013 मध्ये सांगितले होते.

Supreme Court ने या पाच जणांच्या अटकेबद्दल उद्गार काढत म्हटले आहे की,” मतभेद ही लोकशाहीची सुरक्षा झडप असते. त्यामुळे या मतभेदाच्या आधारावर त्यांना अटक करता येत नाही.” असे सांगत आणि देशाच्या अंतर्गत सुरक्षेचा विचार करत त्यांना त्यांच्याच घरात नजर कैदेत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. राष्ट्रीय मानवी अधिकार प्राधिकरणाने या प्रकरणात हस्तक्षेप करत पोलिसांनी अटक केलेल्या व्यवहारात मानक कार्य पद्धतीचा वापर केलेला नाही असं म्हटलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here