statue of unity

भारताचे लोहपुरुष म्हणून ओळखले जाणारे, आणि भारताच्या एकतेसाठी मोलाचा वाटा देणारे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचे अनावरण देशाचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी 31 ऑक्टोबर रोजी करणार आहेत. या पुतळ्याला Statue Of Unity म्हणजे एकतेचा पुतळा या नावाने ओळखले जाईल. हा जगातला सर्वात उंच आणि मोठा पुतळा आहे. फक्त 33 महिन्यांचा कालावधी वापरून हा पुतळा पुर्णतः तयार करण्यात आला आहे. एवढ्या कमी कालावधीत एवढा भव्य पुतळा हा जगातला पहिलाच पुतळा आहे. चीनच्या Spring Temple Of Buddha ला तयार करण्यासाठी 11 वर्षांचा कालावधी लागला होता, असं बांधकाम क्षेत्रातील भव्य कंपनी Larsen & Toubro यांनी म्हटलं आहे.

जर तुम्ही या पुतळ्याची उंची मोजाल तर रोड वरील प्रवेशापासून त्याची उंची 182 मीटर इतकी आहे, आणि जर तुम्ही नदी मार्गाने या पुतळ्याला भेट दिली तर तुम्हाला याची उंची 208 मीटर इतकी असेल. चीनचा Spring Temple Of Buddha जे आहे ते 153 मीटर उंच आहे. त्या पुतळ्याच्या तब्बल जवळपास 20 मीटर हा पुतळा असणार आहे. आणि अमेरिकेच्या न्यूयॉर्क स्थित Statue Of Liberty च्या दुप्पट, हा भारतीय Statue Of Unity असणार आहे.

या unity प्रोजेक्ट साठी एकूण 2989 कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. कांस्य धातू पासून हा विशाल महाकाय पुतळ्याचे काम करण्यात आले आहे. या पुतळ्याचे काम संपूर्णतः भारतीय तंत्रज्ञान वापरून तयार केले गेले आहे. बाहेरून मदत मागितली गेली नाही. नर्मदा नदीच्या पात्रात असलेल्या सरदार सरोवर धरणापासून 3.5 किलोमीटर दूर असलेल्या साधू टेकडीवर हा पुतळा बसवण्यात आला आहे.

या पुतळ्याच्या कामाला सुरुवात ही 19 डिसेंबर 2015 ला झाली आहे आणि ते पूर्ण होण्यासाठी 31 ऑक्टोबर 2018 म्हणजे जवळपास 33महिन्यांचा कालावधी लागला आहे. याच्यासाठी 180,000 cu.m सिमेंट काँक्रीट, 18500 टन स्टील, 6500 टन स्ट्रक्चर्ड स्टील, 1700 टन कांस्य आणि 1850 टन कांस्य कॅ्लडिंग लागले आहे.

सरदार पटेलांचा हा पुतळा त्यांच्या वॉकिंग पोजीशन मधला आहे. त्यांच्या पायात 6.4 मीटरचा गॅप आहे. ज्याला वाऱ्याच्या गतीपुढे टेस्ट केलं गेलं आहे. हा पुतळा पायाच्या ठिकाणी निमुळता करण्यात आला आहे, बाकीच्या जगातल्या अनेक पुतळ्यांचे असे नसते, त्यांच्या बेस हा रुंद आणि मोठा ठेवला जातो. हा भारतीय इंजिनिअरिंगचा अद्भुत नमुना आहे. 180 किलोमीटर प्रतितासाच्या स्पीडने जरी वारे वाहिले तरी या पुतळ्याला काहीही होणार नाही, अशा पद्धतीने या पुतळ्याचे डिझाइन तयार केले गेले आहे. एकाच वेळी पुतळा तयार करताना वाऱ्याच्या वेगापुढे तो टिकला पाहिजे आणि त्या पुतळ्यावरील खरेपणा, भाव हे सुद्धा दिसले पाहिजेत असे काम करताना खूप मोठ्या संकटांना सामोरे जावे लागले.

हा जो पुतळा तयार केला जातोय तो काही अमेरिकेच्या Statue Of Liberty प्रमाणे काल्पनिक नाही, हा जिवंत व्यक्तीचा आणि महान नेत्याचा पुतळा आहे. ” या पुतळ्याचे डिझाइन तयार करण्यासाठी आम्ही पटेलांच्या 2000 फोटोचा अभ्यास करून त्यापासून एक फोटो तयार केला आणि त्याचा वापर पुतळ्याचे डिझाइन म्हणून करत आहोत. अनेक इतिहासकारांशी आणि ज्यांनी सरदार पटेलांना प्रत्यक्षात पाहिले आहे त्यांना बोलून आणि चर्चा करून त्यांची 2D इमेज तयार केली आणि टेक्नॉलॉजीचा वापर करून त्याला 3D मध्ये रूपांतर केले. भारताच्या महान आणि मोठ्या पुतळ्यांचे निर्माते राम सुतार यांनी पुतळ्याच्या चेहऱ्यावरील भाव आणि तेज दाखवण्यासाठी खूप कष्ट केले. त्यांच्या अंगावरील शॉल आणि त्याची घडी आणि खरेपणा जपण्यासाठी त्यांना जिकरीचे काम करावे लागले.

L & T कंपनीचे CEO आणि MD S. N. Subhramanyam यांनी म्हटले की, ” Statue Of Liberty हा फक्त देशाचा अभिमान आणि पटेलांना अभिवादन म्हणूनच नाही तर भारताच्या इंजिनिअरिंग क्षेत्राच्या सुद्धा अभिमानाची गोष्ट आहे. आमची इंजिनिअरिंग आणि कन्स्ट्रक्शन टीमने तसेच जगातल्या अन्य जागतिक स्तरावरील इंजिनिअर आणि पुतळा बनवणाऱ्याशी चर्चा करूनच पंतप्रधान नरेंद्र मोदींचं हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी हा पुतळा साकार करण्यात आला आहे.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here