Aayushman Bharat Yojana:-

भारताने जगातील सर्वात मोठी आरोग्य सुरक्षा विमा योजना 23 सप्टेंबर रोजी भारतभर लागू केली. उद्घाटन समारंभ हा हा रांची झारखंड येथे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडला. त्यासोबतच इतर अनेक केंद्रीय मंत्र्यांनी आणि अधिकाऱ्यांनी देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी या योजनेचा शुभारंभ केला. संपूर्ण जगभरातून भारताची प्रशंसा होत आहे. World Health Organisation(WHO) चे अध्यक्ष Tewodros Adhanom यांनी, “आयुष्यमान भारत ही योजना भारताच्या आरोग्य सुधारणेसाठी गेम चेंजर ठरणार आहे.” अशी प्रशंसा केली. भारत सरकारने या योजनेबद्दल मार्च 2018 मधेच माहिती दिली होती. या योजनेचा मसुदा 21 मार्च 2018 रोजी तयार करण्यात आला होता.

भारतीयांच्या कमतरता आणि अक्षमता लक्षात घेऊन भारताने ही योजना आखली आहे. या योजनेत जनतेला कुठल्याही प्रकारचा प्रीमियम भरावा लागणार नाही. या अगोदर प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेत लोकांना 330 रु वार्षिक प्रीमियम आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेत 12 रु वार्षिक प्रीमियम भरावा लागत होता, पण आयुष्यमान भारत योजनेत लागणारे संपूर्ण प्रीमियम हे सरकारचं लोकांतर्फे भरणार आहे.

◆ ‘आयुष्यमान भारत’ – प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेबद्दल ठळक मुद्दे –

 • आयुष्यमान भारत योजनेत प्रत्येक परिवाराला प्रति वर्ष 5 लाख रुपये आरोग्य विमा मिळेल.
 • सरकारच्या म्हणण्यानुसार या योजनेमुळे भारताच्या 10 कोटी परिवाराला म्हणजेच जवळपास 50 कोटी लोकांना याचा फायदा घेता येणार आहे. म्हणजे भारताच्या जवळपास अर्ध्या लोकसंख्येला याचा फायदा घेता येणार आहे.
 • हे 10 कोटी परिवार सामाजिक-आर्थिक जातीय जनगणना(Socio-Economic caste census), 2011 नुसार निवडले जातील.
 • योजनेतील विम्यासाठी प्रीमियम सरकारचं भरणार आहे, लोकांना एक रुपयाही खर्च करण्याची गरज नाही.
 • पूर्वीच्या राष्ट्रीय स्वास्थ्य विमा योजना आणि जेष्ठ नागरिक आरोग्य विमा योजना या दोन्ही योजना आयुष्यमान भारत मध्ये सामावल्या जातील.
 • त्यामूळे आयुष्यमान भारत ही जगातील सर्वात मोठी आरोग्य सुरक्षा विमा योजना बनली आहे.
 • या योजनेचा फायदा घेऊन विमा मिळवायचा असेल तर तुम्हाला कुठेही उपचार घेता येणार नाही, तुम्हाला उपचार फक्त सरकारी रुग्णालयात आणि सरकारने अनुसूचित केलेल्या रुग्णालयातच घ्यावा लागेल.
 • ही योजना परिवाराच्या सदस्य संख्येवर अवलंबून राहणार नाही. सदस्य संख्या कितीही असो या योजनेचा फायदा घेता येणार आहे.
 • या योजनेत फक्त उपचारादरम्यानचा खर्च धरण्यात आला नसून तुम्हाला उपचारापूर्वी आणि उपचारानंतर जो काही खर्च येईल तो ही दिला जाईल.
 • दवाखान्यात जाण्या-येण्या पर्यंतचा प्रवासाचा नियोजित खर्च सुद्धा या योजनेत लोकांना दिला जाईल.
 •  ही योजना संपूर्ण भारतभर स्थलांतरित करता येते. म्हणजे तुम्ही एक दवाखान्यातून भारतातल्या कोणत्याही अनुसूचित केलेल्या दुसऱ्या दवाखान्यात जरी गेलात तरी या योजनेचा फायदा घेता येईल.
 • योजनेत होणारा खर्च हा संपूर्ण कॅशलेस असेल, त्यामुळे यात पारदर्शकता वाढणार आहे.
 • या योजनेत जे परिवार निवडले जातील त्यांच्यासाठी ग्रामीण आणि शहरी भागातील परिवार असे दोन गट पाडण्यात आले आहेत, आणि यामध्ये परिवार निवडीचे नियम सांगितले आहेत.
 • या संपूर्ण योजनेच्या अंमलबजावणीसाठी जो काही खर्च येणार आहे, तो देशातील केंद्र आणि राज्यसरकारे 60:40 प्रमाणात वाटून घेतील. म्हणजे 60% खर्च हा केंद्र सरकार करेल तर 40% खर्च राज्यसरकारे उचलतील.

तुम्हाला माहीत असायला हवं की सरकारने कमी किमतीत औषधं आणि गोळ्या लोकांना उपलब्द्ध व्हाव्या यासाठी सरकारी दुकाने काढली आहेत. १)जन औषधी स्टोर, रसायन आणि खात मंत्रालयाद्वारे आणि २) अमृत(AMRIT) स्टोर, आरोग्य मंत्रालयाद्वारे. यालाही या योजनेत सामावून घेण्याची शक्यता आहे.

National Sample Survey Organisation(NSSO),2015 च्या अहवालानुसार गेल्या दहा वर्षात भारतातील दवाखान्यातील खर्च 300% टक्क्यांनी वाढला आहे, आणि जो काही एकूण खर्च होतो त्यातील 80% खर्च हा क्षमतेच्या बाहेर जाऊन केलेला असतो. म्हणजे 80 % लोकं आपलं घर, जमीन, मालमत्ता विकून किंवा गहाण ठेवून उपचार करत असतात. त्यामुळे आयुष्यमान भारत- राष्ट्रीय आरोग्य संरक्षण मिशन आणि राष्ट्रीय आरोग्य मिशन या दोन्ही योजनांमुळे भारताच्या आरोग्य क्षेत्रात अतुलनीय बदल होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here