पंजाब मधील अमृतसर येथे आज रावण दहनाच्या कार्यक्रमात अतिशय हृदयद्रावक घटना घडली आहे. अमृतसर येथील जोडा फाटक येथील हि घटना आहे. या जोडा फाटक जवळच रावण दहनाचा कार्यक्रम नियोजित केला होता. हा कार्यक्रम पाहण्यास हजारो लोकांची गर्दी झाली होती. गर्दी झाल्याने काही लोक रेल्वे रूळावर आणि त्याच्या पलीकडे थांबून हा कार्यक्रम पाहत होते.

रावण दहन सुरु झाले तेंव्हा रेल्वे रुळावरील लोकांना एका लोकल रेल्वे चिरडून गेली. दहन सुरु झाले तेंव्हा रावण जळत होता आणि इकडे सर्व आवाजाच्या गोंगाटामध्ये हा रेल्वे अपघात घडला. अमृतसर आणि मानवाला यांच्या मध्ये 27 नं चे गेट आहे येथे हा अपघात घडला आहे.

या घटनेनंतर गृहमंत्री राजनाथ सिंघ यांनी पंजाब चे होम सेक्रेटरी आणि डीजीपी यांना संपर्क साधला आणि म्हणाले कि, “या दुःखाच्या काळात योग्य ती मदत करण्यास केंद्र सरकार तुमच्यासोबत आहे.” पंजाब चे मुख्यमंत्री अमरिंदर सिंघ हे बचाव आणि मदत ऑपरेशन सहित घटना स्थळी पोहचत आहेत.

मुख्यमंत्री अमरिंदर सिंघ यांनी अपघातातील मृत व्यक्तींना 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

इ.स. २०१२ मध्ये अशाच पद्धतीचा अपघात केरळ मध्ये त्रिवेंद्रम-कोझिकोड जन शताब्दी एक्सप्रेस या ट्रेन कडून झाला होता. त्यात तीन मृत्युमुखी आणि एक व्यक्ती जखमी झाला होता.

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here