1) अब्दुल कलाम यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1931 साली रामेश्वरम, तामिळनाडू येथे झाला. त्यांनी त्रिची इथल्या सेंट जोसेफ महाविद्यालयातुन 1954 साली सायन्स मध्ये पदवी मिळवली. नंतर पुढे मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथुन ऐरोनॉटिकल इंजिनिअरिंग मध्ये त्यांनी स्पेशलायजेशन केलं.

2) भारताच्या पहिल्या सॅटेलाईट लाँच व्हेहिकल च्या यशस्वी प्रक्षेपण यांच्याच अध्यक्षतेखाली झालं. रोहिणी हे सॅटेलाईट त्यावेळी पाठवण्यात आलं होतं. यामुळे जगातल्या काही मोजक्या देशांच्या स्पेस क्लब मध्ये भारताची गिणती झाली.

3) ISRO मध्ये त्यांनी जवळपास 20 वर्षे काम केलं आहे आणि त्या वेळेत भारतीय बनावटीचे गाईडेड मिसाईल DRDO मध्ये तयार करण्याचं काम त्यांनीच केलं.

4) त्यांनी अग्नी, पृथ्वी सारखे अतिमहत्वाचे मिसाईल तयार करण्याचं काम केलं. यामुळेच त्यांना ‘मिसाईल मॅन ऑफ इंडिया’ ही पदवी मिळाली.

5) त्यांना भारतातील आणि विदेशातील विध्यापिठाकडून, इन्स्टिट्युशनकडून आत्तापर्यंत एकूण 48 आदरातिथ्य डॉक्टरेट पदव्या मिळाल्या आहेत.

6) कलामांना 1981 मध्ये पद्मभूषण, 1990 मध्ये पद्मविभूषण आणि 1997 मध्ये भारतातील सर्वोच्च अवॉर्ड भारतरत्न प्रदान करण्यात आले होते.

7) सात वर्षासाठी (1992-99) ते पंतप्रधानांचे चीफ सायंटिफिक ऍडवायजर होते तसेच DRDO चे सचिव सुद्धा होते.

8) पोखरण-2 च्या अणुबॉम्ब चाचणीचे शिल्पकार हे अब्दुल कलामच होते. या टेस्ट मुळे आज भारत न्यूक्लीअर पावर क्लब मध्ये गणला जात आहे. भारता व्यतिरिक्त USA, UK, Russia, China आणि France हे पाचच देश न्यूक्लीअर पावर्ड आहेत.

9) अब्दुल कलाम हे एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व होते. ते सायंटिस्ट तर होतेच तसेच ते उत्तम एक राजकारणी, उत्तम लेखक सुद्धा होते. त्यांची बरीच पुस्तके बाजारात फेमस आहेत. India 2020, Wings Of Fire, Ignited Minds अशी आणखी खूप पुस्तके त्यांनी लिहली आहेत.

10) इ.स. 2002 लक्ष्मी सेहगलवर मात करून विजय मिळवत ते भारताचे 11 वे राष्ट्रपती बनले. त्यांच्या कारकिर्दीमुळे त्यांचा ‘लोकांचे राष्ट्रपती’ असा लौकिक होतो.

एपीजे अब्दुल कलाम हे सदैव आपल्या हृदयात जिवंत असतील यात कसलीही शंका नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here