‘Armed Forces Flag Day’ दरवर्षी 7 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. हा दिवस सशस्त्र दलाच्या सैनिकांच्या कल्याणाच्या उद्देशाने साजरा केला जातो. या दिवशी भारताच्या नागरिकांकडून पैसे गोळा केले जातात आणि ते पैसे या सैनिकांच्या कुटुंबाच्या कल्याणासाठी वापरले जातात.

सशस्त्र दल झेंडा दिवस( Armed Forces Flag Day) साजरा करण्याची सुरुवात ही 7 डिसेंबर 1949 रोजी झाली. तेंव्हा पासून दरवर्षी हा सशस्त्र दल झेंडा दिवस हा 7 डिसेंबर रोजी न चुकता साजरा केला जातो.

 

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षा समितीने युद्धातील वीरांना आणि त्यांच्या कुटुंबियांना मदतीसाठी आणि त्यांच्या कल्याणासाठी हा दिवस साजरा करण्याचा निर्णय दिला. सशस्त्र दल झेंडा दिवस साजरा करण्याचे मुख्य तीन कारण आहेत. एक युद्ध काळात जी जनहानी झाली त्यांच्यासाठी, लष्करातील सैन्यांसाठी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी आणि तिसरं सेवानिवृत्त सैनिकांना आणि त्यांच्या कुटुंबियांच्या मदतीसाठी हा दिवस साजरा केला जातो.

या दिवशी इंडियन आर्मी, इंडियन एअरफोर्स आणि इंडियन नेव्ही वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम आयोजित करतात. हा कार्यक्रमाद्वारे उभा केलेला पैसा Armed Force Flag Day Fund मध्ये टाकला जातो.

सर्व नागरिकांनी या दिवसाची दखल घेतली पाहिजे. आणि भारताच्या त्या वीरांना आणि त्यांच्या कुटुंबियांना साथ देण्यासाठी त्यांच्या मदतीसाठी तत्पर असलं पाहिजे. तरच आपला देश सशक्त बनेल. फक्त सरकार त्यांच्यासाठी काम करून भागणार नाही तर संपूर्ण भारतीयांनी त्यांच्या पाठीशी उभ राहिलं पाहिजे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here