ips son

आपण पाहतो की मुलांना वडील कोणत्याही आणि कसल्याही स्थितीत हे आदरणीय असतात. ते कोणत्याही पोस्ट वर असोत किंवा शेतकरी असोत, मूल वडिलांचा आदर ठेवूनच वागत असतात. पण जर समजा तुम्ही ज्या ऑफिस मध्ये काम करत आहात तेथे तुम्ही वरच्या पोस्टवर कार्यरत आहेत आणि वडील तुमच्या निरीक्षणाखाली काम करत असतील तर तुम्ही त्या ठिकाणी कोणती भूमिका बजावाल ? ऑफिसर म्हणून ऑफिस मध्ये वडीलांशी एक सिनिअर ऑफिसर या नात्याने वागाल की वडील या नात्याने ? तुम्ही जर तेथे वडिलांच्या नात्याने वागत असाल तर तुमची ती मोठी चूक आहे. Work Comes First या नियमाने सर्वांना चालायला पाहिजे, तरच या जगात नैतिकता आणि तत्वनिष्ठा ठिकून राहील.

असच एक उदाहरण आपल्याला पाहायला मिळेल, लखनऊ जिल्ह्यातील विभूतीखंड स्टेशन मधील कॉन्स्टेबल जनार्धन सिंह यांचा मुलगा हा IPS ऑफिसर झाला आहे. आणि त्या दोघांची पोस्टिंग ही लखनऊ येथेच झालेली आहे.

अशा परिस्थितीत एक बाप आपल्या मुलाच्या हाताखाली काम करणार आहे. वडील जनार्धन सिंह अभिमानाने सांगतात की,” मी ऑन ड्युटी माझ्या कप्तानला सॅल्युट करेन.” आणि तसेच मुलगा अनुप सिंह ने म्हटले की,” कर्तव्य निभावण्यासाठी मी प्रोटोकॉल चे पालन करिन. मी माझ्या वडिलांकडून कर्तव्य आणि संस्कार शिकलो आहे.”

IPS अनुप सिंह ने सांगितले की, या आधी त्यांनी. गाझियाबाद, नोएडा, आणि उन्नाव येथे ASP(Assistant Suprintendent of Police) या पदावर काम केले आहे. त्यांनी इलाहाबाद विध्यापिठाकडून शिक्षण घेतले होते आणि पुढचे शिक्षण त्यांनी JNU मधून घेतले आहे. यानंतर अनुप ने UPSC साठी तयारी सुरू केली. अनुप ने आपल्या पहिल्याच प्रयत्नात UPSC ची परीक्षा क्रॅक केली आहे.
वडील जनार्धन सिंह सांगतात की, JNU मध्ये चांगले मार्क्स मिळाल्यामुळे जी स्कॉलरशिप मिळते त्यातूनही तो घरी पैसे पाठवायचा. नको म्हटले तरी तो घरी पैसे पाठवून द्यायचा. त्यांच्या कुटुंबात आई कंचन, वडील जनार्धन आणि बहीण मधू आणि पत्नी अंशुल आहेत. सरकारी ऑफिसर असल्याकारणाने तो सरकारी निवासात राहतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here