कधी आपण आपले Bank चे Debit Card नीट पहिले आहे का?जर असेल तर तुम्हाला वरील प्रश्न नक्की कधी ना कधी पडलाच असणार. जर वरिल प्रश्न तुम्हाला पडला नसेल तर तुमचे Debit Card किंवा ATM Card हातात घ्या आणि नीट पहा त्यावर काय लिहिलं आहे ते आणि नंतर हा लेख पूर्ण वाचा.

या लेखातून आपल्याला काय कळणार आहे ?

 1. ATM Card काय आहे ?
 2. Plastic Money म्हणजे नक्की काय?
 3. RuPay कार्ड काय आहे?
 4. VISA आणि Master Card काय आहेत?
 5. Master Card ,VISA card ,Rupay Card मधील फरक.
 6. तुमच्या साठी उपयुक्त आणि चांगले कार्ड कोणते?

या अशा सहा प्रश्नांची उत्तरे आपल्याला मिळाल्यावर आपण आपले Atm card ओळखू शकाल आणि आपल्या वापरा नुसार बदलायचे का नाही ते ठरवू शकाल.
आजकाल बऱ्यापैकी सर्व व्यवहार हे Cash less झाले आहेत. तुम्ही खरेदीला जा, पेट्रोल पंप वर, Collage आणि Exams ची fees भरणे असूदेत. सर्व काही हे ATM Card वापरून होत असते. या Cards मधील फरक आपण जाणून घेणार आहोत, चला तर मग सुरु करूयात !!!

1)ATM Card काय आहे?

आपल्याला माहित असेल पूर्वी बँके मधून पैसे काढायचे असल्यास तुम्हाला Chek अथवा Bank slip भरावी लागत असे. यात लोकांचा वेळ खर्च होई तसेच व्यवस्थापनाला सुद्धा लोकांच्या आक्रोशाला आणि कामाच्या बोजाला बळी पडावे लागत असे. या सर्वांचा अभ्यास करून अर्थव्यवस्थेत सुधारणा आणि Ease of Finance वाढावा या साठी Bank या ATM Cards घेऊन आल्या जे वापरून तुम्ही ATM machine मधून पैसे काढू शकता. बँके यामध्ये लोकांच्या उपयोगा नुसार, ३ प्रकारचे Cards घेऊन आल्या . ते पुढे आपण पाहणार आहोत.

2)Plastic Money म्हणजे नक्की काय ?

जेव्हा आपण कोणतेही ATM card हे Payment करण्यासाठी वापरतो तेव्हा त्या Card ला Plastic Money म्हणतात. आणि हे कार्ड वापरून जे Payment झाले असते त्याला Cashless payment म्हणतात.

3)Rupay कार्ड काय आहे?

 • RuPay Card हे भारताचे आंतरदेशीय ATM Card आहे.
 • याची सुरवात आंतराष्ट्रीय बँक आणि कंपनी यांच्या एकाधिकाराला आळा घालण्यासाठी झाली .
 • आंतरराष्ट्रीय Gateways जसे VISA आणि Master Card यांचे Commission अथवा Transaction Cost हि जास्त असते. असे असूनही RuPay कार्ड हे काही प्रमाणात या आंतरराष्टीय Gatways सारखेच काम करते.
 • RuPay Card हे सर्व अंतर्देशीय आणि Financial Institutions ला Support करते. जसे SBI आणि इतर.
 • बाजारात आपले अस्तित्व टिकवण्या साठी RuPay कार्ड मध्ये अनेक उत्तम दर्जाची Technology वापरण्यात आली आहे .यात सर्वोकृष्ठ उत्तम दर्जाची Chip बसवण्यात आली आहे याला EMV (Europay, Master Card and VISA) या नावाने ओळखतात .

4)VISA Card आणि Master Card काय आहेत?

 • VISA Card आणि Master Card हे आंतरराष्ट्रीय Payment Gateways आहेत. याचा अर्थ, हे वापरून तुम्ही Payment करू शकता.
 • VISA Card आणि Master Card हे फक्त जगभरातील Banks ला Servis देण्याचे काम करतात. बँके कडे Card Issu करण्याची जबाबदारी असते .
 • Interest rate, Rewards , वार्षिक Fee या बद्दल चे अधिकार पूर्ण तः बँक कडे असतात.
 • जगातील अनेक बँक या Card ला Support करतात .
 • Visa Card आणि Master Card या मध्ये भरपूर साम्य आढळते. त्यांचे काम हि सारखे आहे .
 • ये Cards वापरून तुम्ही जगभरातून कोठे हि Payment करू शकता .

5)Master card ,VISA Card ,RuPay Card मधील फरक.

क्र. RuPay Card Visa Card & Master Card
१. हे देशी बनावटी चे Debit card आहे. हे दोन्ही आंतराष्ट्रीय बनावटीचे Debit Cards आहेत.
२. Bank हे Card वापरून होणाऱ्या Transactions वर कमी Service charges लावते. कारण Banks ला सुद्धा या Payment Gateway ला कमी Pay करावे लागते. आंतराष्ट्रीय असल्या मुळे, Bank हे Card वापरून होणाऱ्या Transactions वर जास्त Service charges लावते. कारण Banks ला सुद्धा या Payment gateway ला जास्त Pay करावे लागते.
हे Service Provider Gateway भारतीय असल्या मुळे Verification आणि Processing लवकर होते. हे दोन्ही Service Provider Gateway अमेरिकन आहेत आणि आंतराष्ट्रीय व्यवहारा मुळे Verification आणि Processing ला वेळ लागतो .
याचा वापर फक्त भारतातच करू शकता. यांचा वापर जगात कोठे हि करू शकता.
बँक जर या सोबत Join व्हायचे असेल तर कोणतीही Joining fees आकारली जात नाही . बँक जर या सोबत Join व्हायचे असेल तर Joining fees आकारली जाते.
यांची Servise फक्त Debit कार्ड साठी भेटते. यांची Servise हि Debit card आणि Credit card साठी भेटते.
अंतर्देशीय व्यवहार असल्याने हे जास्त Secure मानले जाते. आंतराष्ट्रीय व्यवहार असल्याने हे काही प्रमाणात Risky मानले जाते.
हे Card ग्रामीण सहकारी बँक , Public Sector Banks व अन्य इतर लहान Banks साठी उपलब्ध आहे. यांची Service हि लहान संस्थां साठी नाही .

6)तुमच्या साठी उपयुक्त आणि चांगले कार्ड कोणते?

वरील माहितीवरून हे कळते कि,

जर आपले व्यवहार मोठे आणि आंतराष्ट्रीय असतील तर आपल्याकडे VISA Card आणि Master Card हे दोन पर्याय उपलब्ध आहेत. उदाहरणार्थ- मोठे व्यावसायिक,आयात निर्यात चा व्यवसाय असणारे लोक, इत्यादी.

जर आपले व्यवहार लहान अथवा भारत देशा पुरते मर्यादित असतील तर तुम्ही RuPay card वापरू शकता या मध्ये आपली बरीचशी Fees वाचू शकेल. उदाहरणार्थ- लहान शेतकरी, गृहिणी, महाविद्यालयीन विद्यार्थी, इत्यादी.

अशा प्रकारे तुम्हाला तुमच्या ATM Card बद्दल सर्व माहिती काळालीच असेल. कृपया या Post च्या खाली कंमेंट करून आम्हाला काळवा कि हि माहिती तुम्हाला कशी वाटली. जेणेकरून आम्ही आपल्यासाठी वेग-वेगळी माहिती मराठी मधून उपलब्ध करू शकू. तुमच्या Comments आमच्या साठी महत्वाच्या आणि प्रेरणादायी आहेत.