तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की आता डॉक्टर आधी कुत्री लावतात मलेरिया सारख्या रोगांचा तपास. हे ऐकून तुम्हाला गोंधळात पडल्या सारख होईल, पण ही सत्य घटना आहे. फक्त असच कोणीतरी म्हटलंय असं नाही, तर यावर व्यवस्थित रिसर्च झाला आहे.

संशोधक वैज्ञानिक सांगतात की, कुत्र्यांना संक्रमित व्यक्तीचा शोध घेण्यासाठी ट्रेन केलं जातं आहे. एका मीडिया रिपोर्ट नुसार असं समोर आलं आहे की, डरहम युनिव्हर्सिटी मध्ये एक प्रयोग केला जातोय, ज्यात कुत्र्यांना मलेरिया डिटेक्ट करण्यासाठी ट्रेन केलं जातं आहे. यावरून असं म्हटलं जातंय की, जनावरांच्या मदतीने मलेरिया सारख्या आजाराला रोखण्यात आणि त्याचे निवारण करण्यास खूप मदत होईल.

जरी हा शोध पहिल्या चरणात असला तरी वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार या शोधामुळे आजारांना डिटेक्ट करण्यासाठी नवीन पद्धतीना उजाळा देण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी खूप मदत होणार आहे. शोधात असं म्हटलं जातंय की, जर एखाद्या व्यक्तीला मलेरिया झाला असेल तर त्या व्यक्तीच्या शरीराची गंध थोडी वेगळी येते. अशामुळे कुत्र्यांच्या मदतीने व्यक्तीला मलेरिया आहे किंवा नाही, ही गोष्ट खूप लवकर डिटेक्ट करता येऊ शकते.

आफ्रिकेतील गांम्बीया मधील एक एरिया मधील मुलांना पायात मोजे घालून रात्रभर ठेवण्यात आलं. नंतर त्या मोज्याना ब्रिटन मध्ये पाठवण्यात आलं. एकूण 175 जोड मोजे होते. त्यापैकी 30 जोड मोजे घातलेल्या मुलांना मलेरिया संक्रमण झाल्याचे आढळून आले. त्या दुर्गंधीत मोज्याना इंग्लंड मधल्या मिल्टन किंग्ज शहरातील मेडिकल डिटेक्टशन डॉग्ज चॅरिटी येथे पाठवण्यात आले. कुत्र्यांकडे गंध ओळखण्याचा खूप पावरफुल सेन्स असतो. येथील कुत्री आधीच कॅन्सर आणि पार्किंसंस सारख्या आजारांना डिटेक्ट करण्यात माहिर आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here