डॉ. प्रकाश आमटे हे थोर समाजसेवक आणि सामाजिक कार्यकर्ता बाबा आमटे यांचे जेष्ठ सुपुत्र आहेत.
बाबा आमटे यांनी कुष्ठरोग्यांच्या कल्याणासाठी त्यांच्या सबलीकरणासाठी आपलं संपूर्ण आयुष्य अर्पण केलं. बाबा आमटे यांच पूर्ण नाव मुरलीधर देविदास आमटे होय. बाबा आमटे यांना त्यांनी केलेल्या कार्यासाठी अनेक पुरस्कार भेटले आहेत.
त्यात सांगायचं झालं तर पद्मविभूषण, डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार, गांधी शांती पुरस्कार, रॅमन मॅगसेसे पुरस्कार, Templeton Prize आणि जमनलाल बजाज अवार्ड, आशा अनेक पुरस्कारांची यादी येते. बाबा आमटे यांनी B.A.LLB पूर्ण केलं होतं. यांना दोन मुले होती. मोठा मुलगा प्रकाश आमटे आणि दुसरा मुलगा विकास आमटे. त्यांचा जन्म 26 डिसेंबर 1914 रोजी झाला होता तर 9 फेब्रुवारी 2008 रोजी आनंदवन येथे वयाच्या 93 व्या वर्षी अनंतात विलीन झाले.
त्यांच्यापश्चात पुढे त्यांचा समाजसेवेचा वारसा त्याचे जेष्ठ पुत्र प्रकाश बाबा आमटे यांनी सुरू ठेवला. प्रकाश बाबा आमटे यांचा जन्म 26 डिसेंबर 1948 रोजी झाला. त्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर येथून M.B.B.S आणि MS Surgery आशा पदव्या घेतल्या आहेत. डॉ. प्रकाश बाबा आमटे यांना सुद्धा 2002 मध्ये भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार भेटला आहे, 2008 मध्ये रॅमन मॅगसेसे पुरस्कार सुद्धा भेटला आहे, तसेच अन्य अनेक पुरस्कार यांना भेटले आहेत. डॉ. प्रकाश बाबा आमटे यांनी दोन आत्मचरित्र लिहिली आहेत त्यातलं एक आहे, ‘प्रकाश वाटा‘(Pathways of Lights) आणि दुसरं आहे ‘रानमित्र‘(Jungle Friends).
डॉ. प्रकाश बाबा आमटे यांची जीवन गाथा
तर झालं असं की जेंव्हा प्रकाश आमटे हे आपल्या फायनल वर्षाच्या रिझल्टची वाट पाहत होते तेंव्हा त्यांचे वडील बाबा आमटे यांनी सर्व परिवाराला घेऊन जंगलात पिकनिकसाठी जायचा बेत ठेवला. सर्व परिवाराला ते आवडलं आणि त्यांनी निघायची तयारी सुरू केली. त्यावेळी ते चंद्रपूर जिल्ह्यात काम करत होते. चंद्रपूर जिल्ह्यातील भांगरागड येथे पिकनिकला जायला निघाले.
आनंदवन पासून ही जागा जवळपास 250 किमी अंतरावर आहे. तरी देखील त्याठिकाणी पोहचण्यासाठी त्यांना 3 दिवस लागले. तेथे जायला रस्ते नव्हते, काही नव्हतं, एका व्हॅन मध्ये सर्व परिवार जंगला-जंगलातून, नद्या-उपनद्या सर्वांना पार करत कसेबसे त्या ठिकाणी पोहचला. तीन नद्यांचा संगम असलेलं हे ठिकाण अतिशय सुंदर, अतिशय निसर्गाच्या कुशीत गेल्यासारख होतं, त्या ठिकाणचं सौंदर्य पाहून सर्व जणांचं तीन दिवसांचा थकवा काही क्षणात निघून गेला.
त्या जंगलातील आदिवासींच्या पाड्यावर हे सर्व जण गेले. त्यांना यांच्याबद्दल काहीच माहिती नव्हती. हे सर्व जण पाड्यावर पोहचताच आदिवासी आपापल्या झोपड्यातून बाहेर आले, त्यांना बोलायचा प्रयत्न करताच ते जंगलात पळून गेले हा एक त्यांच्यासाठीचा विचित्र अनुभव होता. संपूर्ण दिवस त्यांनी त्या भागात घातला. सर्व दृश्य बघून, आदिवासींचं जीवन बघून त्यांना खूप दुःख झालं. त्या दिवशी संध्याकाळी जेंव्हा बाबा आमटे त्यांची दोन मुले शेकोटी पेटवून बसले होते.
अचानक बाबा आमटे उठले आणि त्यांनी म्हटलं की आनंदवन जे की कुष्ठरोग्यांसाठी आहे ते आता बऱ्यापैकी चालतय. आता या आदिवासी लोकांसाठी काहीतरी करण्याची गरज आहे.
तेंव्हा प्रकाश आमटे आणि त्यांच्या बंधूंना कळलं की बाबांनी त्यांना इथे का आणलं आहे. तेंव्हा प्रकाश बाबा आमटे म्हणाले, बाबा तुम्ही पुढे व्हा आम्ही संपूर्णपणे यासाठी तयार आहोत. आम्ही यांच्यासाठी काम करू.
यानंतर दुसऱ्या दिवशी सर्वजण आनंदवनसाठी परत निघाले. रिझल्ट लागला M.B.B.S. पास झाले. तेथील लोकांच्या भल्यासाठी महाराष्ट्र शासनाला चिठ्या लिहिल्या, शासनाकडून काहीच उत्तर आलं नाही. पुढे MS Surgery साठी प्रवेश घेतला. तेथेच मंदाकिनी देशपांडे यांच्याशी भेट झाली. त्या प्रकाश आमटे यांच्या सिनिअर होत्या. त्यांच्याशी त्याचा पुढे विवाह झाला. प्रकाश आमटे यांनी आधीच सांगितले होते की मी या आदिवासींसाठी संपूर्ण जीवन व्यतीत करणार आहे आणि त्यामुळे आपल्याला तेथेच राहावं लागेल. परंतु मंदाकिनी आमटे यांनी कधीच तक्रार केली नाही, त्या सुद्धा जोमाने प्रकाश आमटे यांच्या सोबत आदिवासींसाठी काम करू लागल्या.
आदिवासींसाठी काम करत करत यांचं कार्य वाढू लागलं. शासनाने सुद्धा नंतर त्यांना जंगल विभागाची जमीन दिली. काही स्वयंसेवक ही तेथे आले. ते ही आदिवासींसाठी काम करू लागले. आदिवासींच्या कार्यासाठी, मदतीसाठी हात पुढे येऊ लागले.
सुरुवातीच्या काळात जेंव्हा प्रकाश बाबा आमटे यांनी उपचारासाठी एक छोटीशी झोपडी बांधली होती, तेंव्हा तेथे कोणीही आदिवासी उपचारासाठी येत नव्हता. त्यांचा विश्वास मिळवणे कठीण होते. प्रकाश बाबा आमटे पाड्यावर जायचे आणि त्यांना समजावून सांगायचे की या उपचार करून घ्या, हे तुमच्याच भल्यासाठी आहे.
हळूहळू त्यांनी आदिवासी भाषा, त्यांच्या रूढी, परंपरा शिकल्या. त्यांना आपलंसं वाटेल, आशा गोष्टी करण्यावर भर दिल्या. आदिवासी लोकात कोणी आजारी पडलं तर त्यांच्यासाठी बलिदान म्हणून कोंबड्या, शेळ्या यांचं बलिदान दिलं जायचं. आणि तरी ठीक नाही झालं तर त्यांना असंच सोडून दिलं जायचं. ज्या पेंशटना ते सोडून देतात कमीत कमी त्यांना तरी आमच्याकडे पाठवून द्या, अशी विनंती जेंव्हा प्रकाश बाबा आमटेनी आदिवासीकडे केली, तेंव्हा कुठे हळूहळू पेशंट त्यांच्याकडे येऊ लागले.
पहिला पेशंट जेंव्हा आला तेंव्हा पाचव्या दिवशी तो स्वतःच्या पायावर उभा राहून, स्वतःची बाज खांद्यावर घेऊन तो आपल्या पाड्यावर निघून गेला. तेंव्हा आदिवासी लोकांना लक्षात आलं की या ठिकाणी आजारी लोकं बरे होतात आणि त्यानंतर त्यांचा विश्वास बसला.
आणखी एक असाच पेशंट तेथे आला होता, तो अस्वलाच्या हल्ल्यात जखमी होऊन आंधळा झाला होता आणि त्याला जखमा ही खूप झाल्या होत्या. भुलीचे इंजेक्शन नसताना त्यांनी त्याला टाके घातले. तरी देखील त्या माणसाने तोंडाने उफ सुद्धा केले नाही. तो नीट होऊन घरी गेला. परंतु आंधळा झाल्यामुळे त्याला जंगलात जाता येत नव्हतं आणि त्यामुळे त्याला स्वतःच अन्न मिळवता येत नसल्याने काही दिवसांनी भूकमारीमुळे त्याचा मृत्यू झाला.
हे जेंव्हा प्रकाश आमटे यांना कळालं तेंव्हा त्यांना खूप दुःख झालं. त्यांच्यासाठी ही घटना डोळे उघडणारी होती. आशा पेशंट साठी काम करण्यास सुरुवात केली. त्यांनी असे आंधळे(कॅटरॅक्ट) पेशंट ठीक करून दाखवले, त्यामुळे आदिवासींचा आणखी विश्वास बसला आणि आता ते आदिवासी प्रकाश बाबा आमटे यांच्याकडे येऊ लागले.
अशी काम करत असताना 1973 मध्ये डॉ. प्रकाश बाबा आमटे यांनी लोक बिरादरी प्रकल्प हेमलकसा येथे सुरू केला. आदिवासींच्या कल्याणासाठी हा प्रकल्प सुरू केला गेला. मुख्यतः गडचिरोली जिल्हयातील माडिया गोंड आदिवासींच्या भागात राबवण्यात येत आहे. त्याठिकाणी जवळजवळ 20 वर्षे त्यांनी व्यतीत केले आहेत.
त्यांच्या कार्यामुळे तेथे लोक बिरादरी दवाखाना, तसेच आदिवासी लहान मुलांना शिकण्यासाठी लोक बिरादरी प्रकल्प आश्रम शाळा आणि जखमी आणि अनाथ प्राण्यांसाठी Amte’s Animal Park हे अनाथाश्रम सुरू करण्यात आले. असा हा त्यांचा लोक बिरादरी प्रकल्प मोठ्याप्रमाणात यशस्वी झाला आहे आणि त्याच काम आजही सुरू आहे.

Image Credit – Facebook
अदिवासी क्षेत्रासाठी डॉ.प्रकाश बाबा आमटे यांच्याकडून करण्यात आलेल्या कामासाठी जगातले सर्वोत्कृष्ट आणि दिगग्ज व्यापारी, तसेच मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांच्याहस्ते त्यांना लाईफटाईम अचिव्हमेंट पुरस्कार सुद्धा देण्यात आला आहे. लाईफटाईम अचिव्हमेंट पुरस्कार तेंव्हाच मिळतो जेंव्हा एखाद्यानं संपूर्ण आयुष्य त्या सामाजिक योगदानासाठी घालवलं आहे.
बिल गेट्स यांच्याकडून दिलं गेलेलं अवार्ड हे भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषदेकडून देण्यात आलं आहे. 17 नोव्हेंबर रोजी हे पुरस्कार वितरित करण्यात आले. त्यांच्यासोबतच भारताच्या इतर दोन व्यक्तींना हे पुरस्कार मिळाले आहेत. Dr. Cyrus S. Poonawala आणि Dr. Kiran Muzumdar Shaw यांना सुद्धा लाईफटाईम अचिव्हमेंट पुरस्कार मिळाला आहे. त्यामुळे डॉ. प्रकाश बाबा आमटे यांचं आणि इतर दोघांच ही मनःपूर्वक अभिनंदन.