• मनुष्य हा Social animal आहे. प्रेम, दुःख, आनंद, राग या सर्व भावना इतरांमध्ये व्यक्त करत असतो आणि हि एक प्रकारची नेसर्गिक गरज सुद्धा आहे. अश्या भावनांमध्ये गुरफटलेले जीवन आणि नाती. अश्या अनेक नात्यानं मधील काही नाती, नवरा-बायको चे यात दोन व्यक्ती लग्नाच्या बंधनात अडकून आपल्या संसाराला वळण देतात. तसेच बॉयफ्रेंड-गिर्ल्फ्रेन्ड चे नाते सुद्धा. या नात्यानं जोडणारा रेशमी धागा म्हणजे प्रेम, विश्वास, शेअरिंग, केअरिंग इत्यादी घटकांनी बनलेला असतो. 
  • प्रथम गुलाबी स्वप्ने आणि ते आल्हादायक क्षण असतात, एकमेकांना लॉयल राहण्याचे प्रॉमिस केलं जात, एकत्र जीवनाची जणू ब्लू प्रिंट सादर केली जाते. हे सर्व होत असत ते एक-मेकांच्या गरजा  आणि फायदा या सर्वांचा Subconcious विचारांमधून. मात्र जेव्हा गरजांची दिशा आणि फायद्याचे गणित बदलायला लागते तेव्हा हे घटक कमकुवत होतात तेव्हा धागा तुटतो आणि एकमेकांना दोष देणे चालू होते. तलाक, ब्रेकअप होत राहतात आणि प्रेमाचा काही अर्थच नाही, प्रेम म्हणजे फक्त Physical attraction असते म्हंटले जाते. 
  • पण कधी याचा एका माध्यम दृष्टिकोन ठेवून विचार केला आहेत का? याची करणे आणि उत्तरे स्वतःला विचारून शोधली आहेत का? आणि कधी हा विचार केला आहेत का कि अश्या कोणत्या गोष्टी महत्वाच्या होत्या ज्यामुळे प्रेम हे प्रेमचं राहील असत ? 

तुम्ही रिलेशनशिप मध्ये असाल किंवा तुम्ही तुमच्या भविष्यातील जोडीदाराच्या शोधात असाल तर आज तुम्हाला फार महत्वाच्या ५ गोष्टी आम्ही सांगणार आहोत. ज्या गोष्टी तुमच्या स्वतःच्यामध्ये आणि तुमच्या साथीदाराच्या असणे गरजेचे आहे. 

 चालतात मग सुरु करूयात.

lovely couple

त्यांना काय हवं आहे ते तुम्हाला सांगतात

आपण कोणीही कोणाच्या मनात काय चाललं आहे हे ओळखू शकत नाही. बऱ्याच वेळा आपल्याला अथवा पुढ्याला एक गोष्ट अपेक्षित असते मात्र हे पुढच्याला न सांगता कळावं अशा हट्टा पाई अनेक नात्यानं मध्ये दुरावा येतो. मला हि गोष्ट हवी आहे असे सांगणे म्हणजे एक प्रकारचे Maturity चे लक्षण आहे. जसे, ” आज आपण फिरायला जाऊ .”, “आज मला पूर्ण दिवस पुस्तक वाचनकरावयाचं आहे ज्या मुले मी रिलॅक्स होईल ” असे . 

माफी मागितल्यावर काय करायचं त्यांना माहित आहे

रेलशनशिप मध्ये एकमेकांशी मतभेद होताच असतात हि नेसर्गिक गोष्ट आहे. कारण हे emotions सुद्धा बाहेर पडणे गरजेचे असते. या नंतर पाळी  येते ती माफी मागण्याची. “सॉरी ,पण “, “सॉरी म्हणत असत जेव्हा “. खरेतर फक्त “सॉरी किंवा मला माफ कर” हे अत्यंत पूर्ण शब्द आहेत. Maturity कळते ती माफी मागितल्या नंतर च्या वागणुकी मधून. कारण तुमचे शब्द खोटे असू शकतात मात्र वागणे नाही. माफीनंतर गरजेची गोष्ट म्हणजे तुमच्या वागणुकी मधील फरक. तुमच्या जोडीदारामध्ये हा गुण  असावाच. 

तुम्ही जेव्हा तुम्ही थकून जात तेव्हा ते  मदतीला येतात

Relationship मध्ये Caring हि एक महत्वाची गोष्ट असते. जेव्हा दोघेजण आपापली कामे वाटून घेतात तेव्हा नेसर्गिक आहे कि कोणी थकणार आणि काही कामे राहणार. मात्र तुमच्या भावना समजून तुमचे काम हलके करायला तुमचा पार्टनर यायला हवा आणि हि Quality त्या व्यक्ती मध्ये हवी. जसे तुम्ही जर स्वयंपाक बनवत असाल आणि खूप धावपळी मुले नाही जमलं तर तुमच्या पार्टनर ने इथे मदत करायला हवी. हि एक महत्वाची Quality तुम्ही गृहीत धरायला हवी. 

ते तुमची प्रशंसा करतात

प्रशंसा हि एक अशी गोस्ट आहे जी अगदी छोटी वाटते पण दुसऱ्या व्यक्तीला आनंद, मोटिवेशन, प्रेम इत्यादी गोष्टी देऊन जाते. प्रशंसा हि कामाची असेल, Dedication आणि बलिदानाची असेल मात्र हि एक गोष्ट Longterm  relationship साठी महत्वाची आहे. 

ते तुम्ही आहे तसे स्वीकारतात पण तुम्हाला पुढे जाण्यास सदैव प्रोस्थाहीत करतात

Relationship जेव्हा चालू होते तेव्हा नाण्याची जी बाजू दिसते तीच बाजू आपण गृहीत धरतो. जसा जसा वेळ जातो आणि Partners एकमेकांना ओळखायला चालू करतात तेव्हा काही असे शब्द बाहेर येतात,”मला आधीच माहिती असत तर बरं झालं असतं, तू  असा करतोस अथवा करतेस”

उदाहरणार्थ, जर तुमच्या पार्टनर ला कार चालवता येत नसेल तर ब्लेम कारण्या पेक्षा शिकण्यास Motivate  केले तर रिलेशनशिप मध्ये Understanding आणि Maturity वाढते आणि तुम्ही हि Quality तुमच्या पार्टनर काढे पाहायला अथवा असायला हवी. 

आजच्या आर्टिकल्स मधून इतकच. आम्हाला आशा आहे कि तुम्हाला हे आर्टिकल आवडलं असेल आणि तुमच्या Perspective मध्ये  काही Positiv change आला असेल. तुम्हाला आर्टिकल अंदर्भात काही प्रश्न, अभिप्राय आणि कमेंट असतील तर खाली कॉमेंट बॉक्स कालवा आणि अशीच अर्थपूर्ण माहिती मराठी मधून मिळवण्यासाठी आमच्या ब्लॉग वर असेच येत राहा.