आपल्याला माहीत आहे अमेरिकेच्या वॉलमार्टने फ्लिपकार्टला आपल्यात सामील करून मालकी हक्क घेतले होते. आणि आता वॉलमार्टने फ्लिपकार्टमध्ये गुंतवणूक करत असल्याचे जाहीर केले आहे.

वॉलमार्ट कंपनीने फ्लिपकार्ट मध्ये 1 लाख 15 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक प्रक्रिया आरंभ केली आहे. जेव्हा ही गुंतवणूक प्रक्रिया पूर्ण होईल त्यावेळी फ्लिपकार्टचे कर्मचारी मात्र एका झटक्यात करोडपती होतील असं बोललं जातं आहे.

भारतीय ई-कॉमर्स दिगग्ज कंपनी फ्लिपकार्टने आपल्या कर्मचाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात असं जाहीर केलं आहे की ते इम्प्लॉयी स्टॉक ओनर्शीप प्लॅन्स(ESOP) मधली आपली भागीदारी 126 डॉलर वरून 128 डॉलर प्रति युनिट विकू शकतात. ESOP द्वारे कर्मचाऱ्यांना कंपनीचे शेअर्स दिले जातात.

फ्लिपकार्टच्या ESOP च्या 1,19,47,016 एवढ्या शेअर्सपैकी वॉलमार्टला 62,42,271 एवढे शेअर्स विकत घ्यायचे आहेत. वॉलमार्टने अमेरिकेच्या सेक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्डला ही माहिती सांगितली आहे.

वॉलमार्ट फ्लिपकार्टच्या कर्मचाऱ्यांच्या 5770 कोटी मूल्याचे ESOP विकत घेणार आहे. फ्लिपकार्टचा एकूण ESOP ची किंमत ही 10,818 कोटी आहे. ET ने 8 सप्टेंबरला असा रिपोर्ट सादर केला होता की वॉलमार्ट फ्लिपकार्टचे 8 कोटी डॉलरचे शेअर्स खरेदी करणार आहे. परंतु फ्लिपकार्टच्या एकूण ESOP पैकी फक्त 50% शेअर्सच वॉलमार्ट या वर्षी खरेदी करू शकेल. पुढच्या वर्षी उरलेल्या पैकी 25% शेअर्स आणि त्याहून पुढच्या वर्षात शेवटचे 25% शेअर्स वॉलमार्टला खरेदी करता येतील.

गेल्या वर्षी फ्लिपकार्टने आपल्या मित्र कंपन्यांच्या म्हणजे मिन्त्रा, जबॉंग आणि फोनपे या तीन कंपन्यांच्या 3 हजार पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांच्या 10 हजार कोटी डॉलर मूल्याचे ESOP खरेदी केले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here