भारतात सध्या २८ राज्ये आहेत. प्रत्येक राज्यात भौगोलिक, सामाजिक,आर्थिक आणि सांस्कृतिक दृष्टया भिन्नता आढळते . राज्यांच्या नावाची माहिती घेण्या आधी आपण आपल्या देशाला इंडिया, भारत, हिंदुस्थान अश्या वेगवेगळ्या नावांच्या मागील माहिती जाणून घेऊयात.
“इंडिया” हे नाव इंडस नदी मुळे भेटले.
आर्य संस्कृती मधील लोक इंडस नदी ला सिंधू म्हणत. पर्शियन आक्रमणकारी सिंधू खोऱ्यातील लोकांना हिंदू म्हणू लागले आणि या भूमीला “हिंदुस्थान”.
“भारत” हे नाव वेदां मध्ये सापडते .ऋग्वेदा नुसार, पूर्वी ज्या १० टोळ्या सिंधू आणि गंगा खोऱ्यात स्थायिक झाल्या त्यांच्यात युद्ध झाले आणि भारत नावाची टोळी विजयी झाली आणि पूर्ण भूमीला भारतवर्ष अथवा भारत नाव देण्यात आले.
आता आपण आपल्या देशातील राज्यांच्या नावांबद्दल काहीशी मनोरंजक माहिती घेऊ. आपण या साठी उत्तर भारत,पूर्व भारत,पश्चिम भारत,दक्षिण भारत आणि उत्तर-पूर्व भारत या प्रकारे पाहणार आहोत .
चला तर मग चालू करू !!!
उत्तर भारत
१) हिमाचल प्रदेश
या राज्याचे नाव संस्कृत शब्दात दडले आहे. “हिम ” म्हणजे बर्फ आणि “अचल ” म्हणजे पर्वत. याचा अर्थ बर्फाळ पर्वत असलेलं राज्य.
२) पंजाब
“पंज ” या शब्दाचा अर्थ होतो पाच आणि “अब ” म्हणजे पाणी. पाच नद्यांची भूमी असा हिंदी-इराणी भाषेतील शब्द आहे .
३) उत्तराखंड
हे राज्य २००० साली उत्तर प्रदेश या राज्यातून वेगळे झाले. याचा अर्थ उत्तरेकडील राज्य असा होतो .
४) हरियाणा
“हरी “म्हणजे कृष्ण आणि “आणा ” म्हणजे आला . येथील लोकांचा असा विश्वास आहे कि महाभारत युद्धात कृष्ण देव येथूनच आले होते .
आणि या भूमी ला हरियाणा असे नाव पडले .
५) उत्तर प्रदेश
ज्या प्रमाणे नाव त्या प्रमाणे अर्थ . उत्तर दिशेतील प्रांत अथवा राज्य.
६) राजस्थान
संस्कृत भाषेत “राज ” म्हणजे राजा अथवा राजांचे आणि “स्थान ” म्हणजे स्थळ. या राज्याला राजपुताना सुद्धा म्हणतात याचा अर्थ राजपुतांचे स्थळ अथवा जागा .
पूर्व भारत
७) बिहार
या शब्दाचे मूळ हे पाली भाषेत आहे. “विहार ” म्हणजे राहण्याचे ठिकाण. पूर्वी इथे बुद्धिस्ट साधू राहत. विहार चे रूपांतर बिहार या शब्दात झाले.
८) पश्चिम बंगाल
संस्कृत शब्द “वंगा ” हा मूळ शब्द आहे. पर्शिन भाषेत याला “बांगलाह “असे म्हण्टले गेले . बंगाली भाषेत “बांगला “.
९) झारखंड
मूळ संस्कृत मध्ये असलेला शब्द “झार ” म्हणजे जंगल आणि “खंड” म्हणजे जमीन. जंगल असलेले राज्य .
१०) ओडिसा
हा शब्द संस्कृत मूळ असलेला आहे. “ओद्रा विषया ” किंवा “ओद्रा देशा “. याचा अर्थ ओद्रा लोक जेथे राहतात ते राज्य .
११) छत्तीसगढ
हिंदी भाषेत याचा अर्थ ३६ किल्ल्यांचे राज्य असा होतो.
१२) मध्य प्रदेश
स्वातंत्र मिळण्या पूर्वी ब्रिटिश या राज्याला सेंट्रल प्रोव्हिन्स असे संबोधत. स्वतंत्र मिळाल्या नंतर याला मध्य प्रदेश म्हणजे भारतातील मधोमध असणारे राज्य म्हणून ओळखण्यात येऊ लागले.
पश्चिम भारत
१३) गुजरात
इसवीसन ७००-८०० याकाळात गुजारा या लोकांनी राज्य केलेले हे राज्य. गुज्जर लोकांची भूमी हा अर्थ दर्शविते.
१४) महाराष्ट्र
संस्कृत मध्ये महाराष्ट्र म्हणजे महान राष्ट्र असा अर्थ होतो.
तसेच राजा अशोकाच्या शिलालेखात असे लिहिले आहे कि “राष्ट्रिका” कुळ असणाऱ्या लोकांची भूमी.
इसवीसन ८००-१००० या साली राष्ट्रकूट राजे इथे राज्य करत असल्याने “राष्ट्र “हा शब्द घेण्यात आला असावा .
तसेच काही इतिहासकारांचे असे म्हणणे आहे कि “राष्ट्रा ” हा शब्द रथ या शब्दातून आला आहे.
१५) गोवा
संस्कृत मध्ये “गो “म्हणजे गाई असा होतो .
काहीजणांच्या मते हा पोर्तुगीस अथवा फ्रेंच शब्द असावा.
दक्षिण भारत
१६) तेलंगणा
या शब्दाचा अर्थ “त्रिलिंग” अथवा महादेवाचे तीन लिंग असा होतो .
१७) आंध्र प्रदेश
हा संस्कृत शब्द आहे . “आंध्र ” म्हणजे दक्षिण. येथे राहणाऱ्या जमातीं ना “आंध्र “या नावाने ओळखले जात . आणि मौर्य राजांच्या काळात येथील अधिकाऱ्यांना “आंध्र-भृत्य ” या नावाने संबोधले जात. याचा अर्थ दक्षिणे मधील अधिकारी.
१८) कर्नाटक
“कारू” म्हणजे उंच. हे नाव डेक्कन पठार शी संबंधित आहे.
१९) तामिळनाडू
तामिळ लोकांचे राज्य. तामिळ या शब्दाचा अर्थ “गोड अमृत ” आणि नंदू म्हणजे देश.
२०) केरळा
या राज्यात इसवीसन १००-५०० काळात चारा या राजघराण्याचे अस्तित्व होते. याला “चेरा आलम “म्हणजे चेर लोकांचे राज्य .
संस्कृत भाषेत याचा अर्थ असा कि नवीन जुडलेले राज्य. भौगोलिक दृष्टया हे राज्य या भूमीत नंतर जोडले गेले आहे .
उत्तर-पूर्व
२१) सिक्कीम
“सु ” म्हणजे नवीन आणि “खिम “म्हणजे जागा . नवीन जागा असा या नावाचा अर्थ आहे.
२२) अरुणाचल प्रदेश
संस्कृत मुलासलेला शब्द आहे. “अरुण ” म्हणजे पहाट. “अचल” म्हणजे डोंगर. पहाटेच्या डोंगरांचा प्रदेश .
२३) आसाम
आहोम या राज्यकर्तां मुळे हे नाव प्रचलित झाले . तसेच संस्कृत मध्ये “असमान ” म्हणजे सामान नसलेला असा अर्थ होतो .
२४) मेघालय
संस्कृत मूळ असलेला शब्द . “मेघ ” म्हणजे ढग आणि “आलय ” म्हणजे निवास. ढगांचा निवास असलेले राज्य .
२५) मिझोराम
“मी ” म्हणजे माणसे आणि “झो ” म्हणजे डोंगरावर राहणारी. डोंगरावर राहणाऱ्या लोकांचे राज्य .
२६) मणिपूर
संस्कृत मूळ असलेला शब्द. मण्यांचे राज्य.
२७) नागालँड
“नागा ” हा बर्मीज भाषेतील शब्द आहे याचा अर्थ नाक अथवा कान टोचलेली माणसे असा होतो.
२८) त्रिपुरा
कोकबोरक शब्दा नुसार “तुई “म्हणजे पाण्याचा झरा आणि “परा ” म्हणजे जवळ. तसेच तेथील त्रिपुरा सुंदरी या देवते वरून सुद्धा अर्थ लावला जातो.
२०१९ मध्ये भारत सरकार ने जम्मू-काश्मीर या राज्याचा दर्जा काढून दोन वेगळे केंद्रशासित प्रदेश केले आहेत.आता जम्मू-काशीर राज्य नसून केंद्रशासित प्रदेश आहे.
मला आशा आहे कि तुम्हाला आज काहीतरी नवीन शिकायला मिळाले. अशाच, मराठी मधून भन्नाट माहिती आणि आर्टिकल्स साठी या ब्लॉग ला विशीत करा. जर तुमच्या काही सूचना अथवा प्रश्न असतील तर कंमेंट बॉक्स मध्ये लिहून कळवावे.