हे बघ भाऊ, अनेकांना हा प्रश्न पडतो की युट्युब हे पैसे कमावण्याचे माध्यम होऊ शकते का? आणि कसे? तर होय… युट्युब द्वारे कुणीही पैसे कमवू शकतात… ते ही अधिकृतरित्या! जाणून घेऊया भाऊ…

आपल्याकडे पैसे कमावण्याचे साधन म्हणून फक्त दोन गोष्टींकडे लक्ष केंद्रित केले जाते. एक म्हणजे व्यवसाय, आणि दुसरी नौकरी. पण हे दोन पारंपरिक मार्ग सोडले तर आणखी बऱ्याच मार्गाने लक्ष्मी घरात येऊ शकते. त्यात ऑनलाइन प्लॅटफॉर्म हाताशी असेल तर आणखी सोपं आहे. गरज आहे ती फक्त अल्पशा ज्ञानाची. ऑनलाइन पैसे कमावण्याचे सर्वात सोपे, अधिकृत आणि निश्चित असे दोन प्रकार आहेत. एक ब्लॉगिंग आणि दुसरा युट्युब! या दोन्हीतला त्यातल्या त्यात सोपा मार्ग म्हणजे युट्युब.

युट्युब माहीत नाही असा नेटकरी व्यक्ती दुर्मिळ. विविध व्हिडीओ पाहण्यासाठी युट्युब सारखा मोठा प्लॅटफॉर्म सध्या तरी उपलब्ध नाही. ब्लॉग लिहिणे सोपे असले तरी लोकांना तो वाचण्यासाठी ओढून आणणे सोपे नाही. वाचण्यापेक्षा दृकश्राव्य माध्यमातून पाहणे लोक जास्त पसंत करतात. इथेच युट्युब बाजी मारून जाते. दुसरी गोष्ट म्हणजे ब्लॉग साठी पैसे खर्च करून स्वतःचे डोमेन आणि स्टोरेज स्पेस खरेदी करावी लागते. युट्युब वर हे सगळं मोफत उपलब्ध आहे. तिथे आपले नाव, मेल आयडी आणि बाकी डिटेल्स टाकले की अवघ्या काही मिनिटात स्वतःचे चॅनेल तयार होते. युट्युब हे जगभरात पोहोचलेले माध्यम असल्याने आपला ऑडियन्स हा जागतिक असतो. तुम्ही अपलोड केलेला व्हिडीओ जास्तीत जास्त किती वेळा आणि किती जणांनी पहावा याला काही मर्यादा नाही.

एकदा चॅनेल सुरू केले की आपण पैसे कमावण्यासाठी रेडी झालो असे समजा. आपल्याला तिथे AdSense नावाचे एक ऑप्शन दिसते. हे ऍडसेन्स अप्रुव्हल मिळवणे फार सोपे आहे. ऍडसेन्स कशा प्रकारे काम करते ते आपण पुढे पाहूया… आणि आता पैसे कसे मिळवायचे याची स्टेप बाय स्टेप माहिती घेऊया…

1. गुगल ऍडसेन्स

आपल्या चॅनेलवर एकदा हे गुगल ऍडसेन्स लागू झाले की त्याचा वापर पैसे कमावण्यासाठी करता येतो. हे ऍडसेन्स आपोआप व्हिडीओ वर जाहिरातींच्या लिंक देण्यास सुरुवात करते. एखाद्या दर्शकाने त्या लिंक वर क्लिक केले की ठराविक पैसे तुमच्या अकाउंट मध्ये जमा होतात. म्हणजे जेवढे जास्त दर्शक तेवढीच क्लिक करण्याची जास्त शक्यता असते.

2. स्पॉन्सर्ड व्हिडीओ

हा पैसे कमावण्याचा दुसरा मार्ग आहे. एकदा का तुमचे चॅनल पॉप्युलर झाले की हा मार्ग वापरता येतो. सबस्क्राईबर आणि दर्शक संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्यानंतर आपल्या चॅनेल कडे बड्या बड्या कंपन्यांचे लक्ष वेधले जाते. त्या स्वतःहून आमच्या जाहिराती तुमच्या व्हिडिओवर घ्या असे म्हणत तुमच्याकडे येऊ लागतात. या जाहिराती तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीला किंवा शेवटी दाखवू शकता आणि बदल्यात मस्तपैकी रक्कम कंपन्यांकडून घेऊ शकता.

3. प्रॉडक्ट मार्केटिंग

हा तिसरा प्रकार. यात तुम्ही एखाद्या कंपनीचे प्रॉडक्ट किती चांगले आहे याची जाहिरात तुमच्या व्हिडीओ मध्ये करू शकता किंवा पूर्ण व्हिडीओ जाहिरातीचा बनवू शकता. सगळ्यात शेवटी ते प्रॉडक्ट विकत घेण्यासाठी लिंक देऊ शकता. जर तुम्ही केलेली जाहिरात आकर्षक असेल तर दर्शक अर्थातच लिंक वर क्लिक करतील आणि मोबदल्यात तुम्हाला चांगले कमिशन मिळेल.

अश्या पद्धतीने अगदी सोप्या उपायांनी युट्युबवर पैसे कमावता येतात. या प्लॅटफॉर्मवर सर्व प्रकारचे व्हिडीओ फॉरमॅट चालत असल्याने तुम्ही डिजिटल कॅमेरा, मोबाईल कॅमेरा, प्रोफेशनल कॅमेरा अश्या कोणत्याही कॅमेरामधून शूट केलेले व्हिडीओ इथे अपलोड करू शकता.

आता काही महत्वाच्या संज्ञा माहीत असणेही गरजेचे आहे. चला जाणून घेऊयात…

1. CPM : Cost per thousand ads impression. पैसे अकाउंट मध्ये जमा होण्याचा हा एक टप्पा असतो. एखाद्या व्हिडीओ वर हजार जाहिराती आल्या की त्या हिशोबाने पैसे जमा केले जातात. CPM वाढवण्यासाठी वय, वेळ, लिंग, कंटेंट या गोष्टींचा योग्य ताळमेळ राखणे गरजेचे आहे. उदाहरणार्थ, सुट्टीच्या दिवशी CPM जास्त येतो. इंग्लिश बोलणाऱ्या देशांमध्ये CPM चा दर जास्त आहे.

2. RPM : Revenue per thousand views. हजार वेळा दर्शकांनी एखादा व्हिडीओ बघितला तर त्यातून किती कमाई झाली याचा हिशोब म्हणजे RPM. तर या कमाईतला 45% हिस्सा हा युट्युबच्या मालकीचा असतो. युट्युबला यातूनच रेव्हेन्यू मिळत असतो.

या गोष्टी वाचून जर तुम्हाला वाटत असेल की हे फारच सोपे आहे तर थांबा! इथे केला व्हिडीओ अपलोड आणि मिळाले पैसे असं नसतं. अनेकजण स्वतःचे चॅनेल सुरू करतात पण त्यातले मोजकेच लोक यशस्वी होतात कारण त्यांनी युट्युबचे नियम पाळले असतात. कुठला व्हिडीओ लोकांना आवडेल आणि कुठला नाही याचाही अभ्यास करावा लागतो. आता पाहूया अधिकाधिक पैसे मिळावे म्हणून काय करावे आणि काय नाही…

हे करा –

  • असे व्हिडीओ बनवा जे ऑल टाईम हिट असतील. लोकांनी ते कधीही पाहिले तरी त्यांना बघण्यात इंटरेस्ट वाटेल.
  • लोक जास्तीत जास्त ज्या गोष्टी शोधतात अश्या विषयावरचे व्हिडीओ बनवले तर जास्त हिट होतात. उदा : सिनेमा आणि राजकारण. (पॉर्न युट्युबवर बॅन आहे)
  • व्हिडीओ असा हवा ज्यावर जास्त कमेंट्स, लाईक्स येऊ शकतात. तसेच अधिकाधिक लोक त्याला शेअर करतील तेव्हा RPM, CPM आपोआप वाढेल.
  • नेहमी आपले चॅनेल लोकांनी सबस्क्राईब करावे यासाठी प्रयत्न करत राहा. त्यासाठी सोशल मीडियाचे इतर प्लॅटफॉर्म (फेबु, व्हाट्सअप्प,इ.) चा आधार घेऊ शकता.
  • आपल्या व्हिडिओला आकर्षक, कॅची नाव द्या. सोबत सर्च मध्ये सहज सापडतील असे किवर्ड्स वापरा.
  • आपल्यासारखे व्हिडीओ बनवणारे दुसरे लोक शोधा. त्यांच्या चॅनेलची जाहिरात आपल्या चॅनेलवर आणि आपली जाहिरात त्यांच्या चॅनेलवर करा. अश्या क्रॉस मार्केटिंगमुळे दुप्पट दर्शक वाढू शकतात. यात फायदा दोघांचा आहे पण नुकसान कुणाचे नाही.

हे करू नका –

  • लोकांचे व्हिडीओ अजिबात कॉपी पेस्ट करू नका. युट्युब कॉपीराईट कायद्याचा सन्मान करते आणि तुम्ही कायदा तोडत असाल तर तुमचे चॅनेल कायमस्वरूपी बंद करते.
  • युट्युबचे नियम व्यवस्थित वाचून त्या नियमांच्या अधीन राहूनच व्हिडीओ बनवा. अश्लील व्हिडीओ, हिंसाचार वगैरे गोष्टींना इथे स्थान नाही.

लक्षात घ्या, युट्युबवर पैसे कमावणे ही स्लो अँड स्टेडी प्रोसेस आहे. सुरुवातीला इथे प्रचंड पेशन्स ठेवावा लागतो. मात्र एकदा चॅनेल लोकप्रिय झलकी नंतर जास्त मेहनत न करता आपोआप रेव्हेन्यू मिळायला सुरुवात होते.

तुम्ही इथे वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ अपलोड करू शकता. त्यासाठी फार मोठे आणि महागाचे तंत्रज्ञान असणे आवश्यक नाही. उदाहरणार्थ, अनेक इमेजेस एकत्र करून त्याचा स्लाईडशो बनवून त्याची स्वतःच्या आवाजात माहिती देऊ शकता. याला ‘इमेजेस व्हॉइस ओव्हर’ म्हणतात.

तसेच विविध वस्तूंचे/सिनेमांचे रिव्ह्यू सुद्धा सादर करू शकता. यासाठी फक्त मोबाईल कॅमेरा पुरेसा आहे.

मग सुरू करताय ना स्वतःचे चॅनेल? आमच्यातर्फे तर्फे बेस्ट लक!