आपल्याला नेहमीच पेट्रोल-डिझेल आपल्या गाडीत भरण्यासाठी पेट्रोलपंपावर लांबच लांब रांगेत थांबावे लागते. त्यामुळे आपला तसेच इतर सर्व गाड्याधारक नागरिकांचा खूपच वेळ वाया जातो. त्यासाठी इंडियन ऑइल कंपनीने नागरिकांच्या मदतीसाठी एक वेगळीच शक्कल लढवली आहे.

इंडियन ऑईल कंपनीने आता मोबाईल पेट्रोलपंप सुरू केले आहे. त्यात पेट्रोल आणि डिझेल साठवण्यासाठी टँकर आहे तसेच पेट्रोल डिझेल वाटपासाठी मशीन त्याच गाडीवर आहे. या गाडीमुळे तुम्हाला घरी बसून पेट्रोल डिझेल घरी मागवता येणार आहे. तुम्ही मागवलेले पेट्रोल-डिझेल तुमच्या घरापर्यंत ती गाडी घेऊन येईल.

तुम्ही घर बसल्या 200 लिटर पर्यंत इंधन मागवू शकता. या पेक्षा मोठी ऑर्डर मागवण्यासाठी तुमच्याकडे पेट्रोलियम अँड एक्सप्लोसिव्ह सेफ्टी ऑर्गनायझेशनचा परवाना असणे गरजेचे आहे. एक ट्विट करून इंडियन ऑइल कंपनीने ही सर्व माहिती दिली आहे. नागरिकांसाठी सुरू केलेली ही सेवा खूपच आकर्षक आहे, सर्वांचे लक्ष याकडे लागले आहे. आता त्यामुळे तुम्हाला पेट्रोल पंपावर रांगेत उभा राहावे लागणार नाही. कंपनीने एक विशिष्ट टँकर तयार केले आहे. या मोबाईल पेट्रोलपंपावर एक विशिष्ट यंत्र बसवण्यात आले आहे. हे यंत्र इंधनाच्या होम डिलीव्हरी प्रक्रियेसाठी मदत करणार आहे. या यंत्राला पेट्रोलियम अँड एक्सपोसिव्ही सेफ्टी ऑर्गनायझेशन ची मंजुरी मिळाली आहे.

इंडियन ऑइल कंपनीचे चेअरमन संजीव सिंह म्हणाले की कंपनीने आधी डिझेल ची घरपोच सेवा सुरू केली होती आता पेट्रोल ची ही घरपोच सेवा कंपनीने सुरू केली आहे. हा कंपनीचा एक पायलट प्रोजेक्ट आहे. लवकरच संपूर्ण देशभरात ही सेवा लागू होईल. या सेवेचा उपभोग घेण्यासाठी तुम्हाला एक अँप्लिकेशन डाउनलोड करावे लागणार आहे. त्या अँप्लिकेशन द्वारे तुम्हाला पेट्रोल-डिझेलची ऑर्डर मागवता येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here