Michael Dertouzos

Michael Dertouzos हा कॉम्प्युटर सायन्स विषयातला वैज्ञानिक आहे. 1974 पासून आपल्या मृत्यू पर्यंत म्हणजे 2001 पर्यंत त्याने M.I.T. प्रयोगशाळेत त्या शाळेचा डायरेक्टर म्हणून काम पाहिले. भविष्यात म्हणजे सध्या इंटरनेटमुळे लोकांच्या जीवनावर जो प्रभाव पडला आहे, याची भविष्यवाणी त्यांनी आधीच केली होती.

यांचा जन्म ग्रीसची राजधानी अथेन्स येथे झाला. त्याची आई ही पियानो बदक होती तर वडील हे ग्रीक नेव्हीत ऍडमिरल होते. अथेन्स मधल्या एका कॉलेज मध्ये Michael नी आपली पदवी परीक्षा पास होऊन तो पदवीधर बनला. नंतर Fulbright Scholarship भेटल्या मुळे University Of Aarkansas येथून त्यांनी उच्च शिक्षण घेतले आणि पुढे M.I.T. मधून त्यांनी Ph.D पूर्ण केली आणि 1968 पासून ते M.I.T. मधेच शिकवू लागले होते.

M.I.T. मध्ये असतानाच त्यांनी लोकांच्या वयक्तिक कॉम्प्युटर च्या आवडीविषयी भविष्यवाणी केली होती, जी की आता खरी ठरत आहे. त्यावेळी पर्सनल कॉम्प्युटर चे पोटेनशिअल वाढवण्यासाठी त्यांनी खूप काम केलं होतं.

आपल्या एका ब्लॉग मध्ये गूगल लिहतो, ” Michael च्या करकीर्दीतच M.I.T. हे एक प्रभावी रीसर्च सेंटर बनलं. शेकडो लोकांना यांच्यामुळे M.I.T. मध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात काम करता आलं.या क्षेत्रामध्ये distributed systems, time-sharing computers, the ArpaNet, आणि RSA encryption, an algorithm used to ensure secure data transmission यांचाही समावेश होतो. Michael यांनी LCS ला उत्तर अमेरिकेचं World wide web consortium चं घरं बनवण्यासाठी खूप मेहनत घेतली होती.”

त्यांनी टेक्नॉलॉजीचं मानवी जीवनातील महत्त्व वाढवण्यासाठी आणि मानवी जीवनाच टेक्नॉलॉजीच्या उद्धारासाठी दोन्ही बाजूचं महत्त्व वाढवण्यासाठी खूप काम केलं आहे. 1999 च्या Oxygen Project, LCS आणि MIT च्या Artificial Intelligence lab यांना पार्टनर्शीप मध्ये आणण्यात त्यांचा खूप मोठा हात होता. या प्रोजेक्टमुळे तो कॉम्प्युटर ला मानवी जीवनात एवढं रुजवणार होता की ज्याप्रमाणे हवा आपल्यात मिसळली आहे.

Michale यांनी आपलं ज्ञान आणि इच्छा त्यांच्या 1997 च्या पुस्तकात नमूद करून ठेवल्या आहेत. त्यांच्या पुस्तकाचं नाव ‘What Will Be: How the New World of Information Will Change Our Lives,’ हे आहे. त्यांच्या शेवटच्या पुस्तकाने त्यांचा टेक्नॉलॉजी वरचा विश्वास किती होता, कसे ते त्याला त्यांच्या दृष्टीने पाहत होते याचं विश्लेषण केले आहे. त्यांच्या त्या शेवटच्या पुस्तकाचं नाव ‘The Unfinished Revolution: Human-Centered Computers and What They Can Do For Us‘ हे होतं.

अशा या महान वैज्ञानिकाचा अंत ऑगस्ट 27, 2001 मध्ये झाला. त्यांना मान देण्यासाठी आणि त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी गूगल ने आज त्यांच्या जन्म दिनी त्यांच्या छायाचित्रांचे गुगलवर डूडल ठेवले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here