झांशी मधील कोतवाली पोलीस स्टेशन मध्ये कॉन्स्टेबल असलेली महिला

तिच्या एका छोट्याश्या कृती मुळे संपूर्ण भारतात अभिमानाची बाब बनली आहे. नेहमीप्रमाणे ती शुक्रवारी पोलीस स्टेशन मध्ये कामावर गेली, आणि ती आपलं काम करू लागली पण त्यात एक छोटासा बदल होता, या छोट्याशा बदलामुळे तर ती सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. तो छोटासा बदल काय होता, ते आपण पुढे पाहूया.

त्या कॉन्स्टेबल महिलेचं नाव आहे अर्चना ती 30 वर्षांची आहे. ती कोतवाली पोलीस स्टेशन मध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून काम करते. या महिलेची फोटो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होतेय. कारण या फोटोत ती तिच्या सहा महिन्यांच्या लहानशा बाळा बरोबर आहे. ती ज्या टेबलावर काम करते त्या टेबलावर तिचं सहा महिन्याच बाळ झोपलं होत, आणि ती काम करत आहे. त्या बाळाला चक्क पोलीस स्टेशन मध्ये घेऊन आणणे आणि तिथेच ती त्याला घेऊन, त्याचा सांभाळ करत काम करणे, या गोष्टीमुळे सर्वांना तिचा अभिमान वाटत आहे. ती एकीकडे आईच कर्तव्य आणि दुसरीकडे आपल्या कामाबद्दल कर्तव्यनिष्ठ राहून युक्तीने दोन्ही कर्तव्य पार पाडत आहे.

तिच्या सिनिअर पोलीस ऑफिसर्सनी तिच्याबद्दल ट्विटर वर ट्विट केले आहे. आणि त्यांनीच हा फोटो शेअर केला आहे. अर्चना ही आग्रा येथे राहणारी आहे, 2016 मध्ये तिचं ट्रान्सफर झांशी येथे झालं. तिचा पती गुडगाव येथे एका प्रायव्हेट फर्म वर काम करत असल्यामुळे तो तिच्या बरोबर येथे राहत नाही. त्यामुळे तिला त्या बाळाला सोबत घेऊन येण्यावाचून कोणताच पर्याय शिल्लक नव्हता. तिला आणखी एक मोठी मुलगी आहे, जी 11 वर्षाची आहे. ती कानपूर मध्ये तिच्या आईवडीलांसोबत राहते. “Incredible. Does’nt need any caption.” असं उत्तर प्रदेश पोलीस डिपार्टमेंट मधील IG ‘नवनीत सेकेरा‘ यांनी ट्विट केलंय.

ती खूप गुणी आहे आणि आपल्या कामाबद्दल कर्तव्यनिष्ठ आहे. असं कोतवाली पोलीस स्टेशन मधील एका ऑफिसर ने म्हटले आहे. झांशीचे DIG सुभाष सिंह भागेल यांनी तिला रोख 1000 रुपयाचं बक्षीस ही दिलं आहे.

https://twitter.com/hashtag/PictureOfTheDay?src=hash

“माझे सिनिअर खूप मदत करणारे आणि दयाळू आहेत. माझं बाळ जर कदाचित रडत असेल तर ते त्याची काळजी घेतात. माझी अशी इच्छा आहे की माझं ट्रान्सफर आग्र्याला होईल आणि मी माझ्या परिवारासोबत सहकुटुंब राहीन जेणेकरून माझ्या कामा बरोबरच माझ्या बाळाचीही निगा व्यवस्थित राखली जाईल.” असं अर्चना म्हणाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here