दिगग्ज कलाकार श्री श्रीराम लागू यांचं अनंतात विलीन झाले आहेत. मंगळवारी रात्री वयाच्या 92 व्या वर्षी त्यांनी शेवटचा श्वास घेतला. सूत्रांच्या माहितीनुसार त्यांच्यावर गुरुवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे.

त्यांनी मराठी तसेच हिंदी चित्रपट सृष्टीत मोलाची कामगिरी केली आहे. त्यांच्या मराठी चित्रपटात सिंहासन, सामना, शासन आशा मोठ्या चित्रपटांचा समावेश होतो. पुण्याच्या दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचा मुलगा अमेरिकेत असल्यामुळे गुरुवारी त्यांचा अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.

मराठी चित्रपटात तर त्यांनी कार्य केलंच आहे. परंतु हिंदी चित्रपट सृष्टीत ही त्यांनी मैलाचा दगड रोवला आहे. कधी काळी हिंदी चित्रपट सृष्टीचे सगळ्यात विख्यात कलाकार होते. त्यांच्या हिंदी चित्रपटात कलाकार, सौतन, लावारीस, मुकद्दर का सिकंदर आणि प्रोफेसर प्यारेलाल आशा अनेक दिगग्ज चित्रपटांचा समावेश होतो.

अनेक सोशल मीडिया वापरणारे लोक त्यांना ‘खरा नटसम्राट‘ म्हणून श्रद्धांजली वाहत आहेत. मराठी सिनेसृष्टीतील विख्यात कलाकार श्री श्रीराम लागू आपल्यात नाही आहेत, म्हणून दुःख व्यक्त करत आहेत. #natsamrat असे हॅशटॅग लोक वापरत आहेत.

1978 मध्ये घरोंदा चित्रपटासाठी त्यांना फिल्मफेअर अवॉर्ड सुद्धा मिळाला आहे. तसेच 2016 मध्ये मास्टर दिनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान कडून सुद्धा त्यांना पुरस्कार मिळाला आहे.

सिनेसृष्टीत त्यांनी आपलं योगदान तर दिलंच आहे, पण श्री लागू हे ENT सर्जन होते. त्यांनी यासोबतच अनेक मराठी नाटकांचं दिग्दर्शन सुद्धा केलं आहे. अशा या महान आत्म्यास कोटी कोटी प्रणाम…!