maratha aarkshan

महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला नौकऱ्यांमध्ये आणि शिक्षणासाठी, सामाजिक आणि शैक्षणिक कॅटेगरीत 16 % आरक्षण देणारं विधेयक विधिमंडळासमोर मांडलं आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे की, ” आम्ही मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी जी आवश्यक कार्यवाही आहे ती संपूर्ण पूर्ण केली आहे आणि आज आम्ही त्याचं विधेयक विधिमंडळासमोर मांडत आहोत. परंतु धनगर समाजाच्या आरक्षणाबद्दल आमची कार्यवाही पूर्ण झालेली नाही अजून त्यांचा रिपोर्ट आलेला नाही. लवकरात लवकर हा रिपोर्ट पूर्ण केला जाईल आणि धनगर समाजासाठी आरक्षणाचं विधेयक लवकरच मांडलं जाईल.”

बुधवारी, राज्याचे महसूलमंत्री श्री चंद्रकांत पाटील यांनी राज्य कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या उप-समितीची बैठक घेतली. यात आजच विधेयक मांडण्यापूर्वीच पुढे ढकलण्यात आले, यावर चर्चा झाली होती.

या आधी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या युती सरकारने मराठा समाजाला 16 % आरक्षण लागू केलं होतं. परंतु ते कायद्याच्या कसोटीवर खरं उतरलं नाही. बॉम्बे उच्च न्यायालयाने या आरक्षणाला स्थगिती दिली होती. विरोधी पक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मराठा समाजाला आरक्षण द्या म्हणून सूचित करणारा SBCC रिपोर्ट आणि टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स यांचा धनगर समाजाला आरक्षण द्या म्हणवणारे दोन्ही रिपोर्ट विधिमंडळात चर्चेसाठी घ्या, अशी मागणी करत आहेत.

धनगर समाजाला अनुसूचित जाती गटातून आरक्षण देण्यासाठी मागणी जोर धरत आहे. मराठा समाजाला नौकऱ्यांमध्ये आणि शिक्षणात आरक्षण देण्यासाठी जो SBCC रिपोर्ट आला आहे त्याचा अभ्यास करण्यासाठी कॅबिनेट उप-समिती गेल्या आठवड्यात गठीत करण्यात आली होती. त्या समितीचे अध्यक्ष महसूलमंत्री चंद्रकांत पाटील आहेत.

महाराष्ट्र सरकारला आयोगाचा रिपोर्ट 15 नोव्हेंबर रोजी मिळाला होता आणि दोन दिवसांनंतर 18 नोव्हेंबर रोजी राज्याच्या कॅबिनेट मंत्रिमंडळाने त्याला अप्रुव्हल दिले होते. मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशी मागणी खूप दिवसांपासून होत आहे. राज्याच्या एकूण लोकसंख्येच्या 30 % लोक हे मराठा आहेत. यावर्षीच्या जुलै आणि ऑगस्ट मध्ये आरक्षणाच्या मागणीने हिंसक वळण घेतले होते.

परंतु हे विधेयक कायद्याच्या कसोटीवर खरं उतरेल काय यात अजूनही शंका आहे. मराठा समाजाला मिळत असलेल्या आरक्षणामुळे राज्याचे एकूण आरक्षण कोटा 68 % पर्यंत पोहचले आहे. 50 % पेक्षा जास्त आरक्षण देणे हे न्यायालयात टिकण्यासारखे नाही. याचे भविष्य काय असेल ते येत्या काळात आपल्याला कळेलच.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here