मराठी साहित्यातील लेखकांचा उल्लेखनीय वाटा ज्यामुळे मराठी वाचकांसाठी काहीश्या लक्ष वेधणाऱ्या गोष्टी या पुस्तकातून घडून आल्या.

मराठी भाषा हि आपली मायबोली असल्यामुळे मराठी भाषेत कुठल्याही प्रकारचे वाचन केल्यास ते सरळ आपल्या मनात उतरते. सध्याच्या काळात फार कमी लोक आहेत ज्यांना अजूनही वाचनाची आवड आहे. वाचक हा आपल्या वाचनाशी संलग्न असला पाहिजे ज्यात तो त्याच्या वाचनाशी संपूर्णपणे एकरूप झाला पाहिजे. सध्या वाचन करण्यासाठी आपल्याकडे फार वेळ नसतो परंतु वाचनामुळे आपल्या जीवनातील खूप सारे प्रश्न सुटू शकतात, सध्याच्या काळात जुन्या कादंबऱ्या वरतीच कित्येक हिट चित्रपट पण येतात, दुनियादारी हा प्रसिद्ध मराठी चित्रपट सुहास शिरवाळकर यांच्या दुनियादारी या कादंबरी वर अवलंबून आहे, माणसाने वाचन करणे फार महत्वाचे आहे.

आपल्या मराठी भाषेत असेही काही लेखक आहेत किंवा होऊन गेले आहेत ज्यांचे लेखन हे वाचकासाठी आजही प्रभावशाली आहे, अशाच काही सुप्रसिद्ध लेखकांची निवडक पुस्तके आपण जाणून घेणार आहेत.

1.कोल्हाट्याचं पोर – किशोर शांताबाई काळे
यामध्ये लेखकांनी त्यांच्या सुरुवातीच्या काळातील काही वाईट आणि आश्चर्यजनक गोष्टींचा उलगडा केला आहे. कोल्हाटी समाजातील दाहकतेचे वास्तव दर्शन घडविले आहे ज्यात काही धनदांडग्या लोकांकडून या समाजातील लोकांवर कशा प्रकारे शोषण होत असत याचादेखील उल्लेख करण्यात आला आहे. लेखकाने कोल्हाटी समाजातील कलावंताच्या जीवनात त्यांना झालेल्या त्रासातून प्रेरणा निर्माण केली आहे जी आपल्यासाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल.

2. बलुतं – दया पवार
लेखकाने या कादंबरीतून अंधश्रद्धा व जुन्या रूढीमुळे आपण किंवा आपल्या समाजाचे तथ्य काय आहे याकडे दुर्लक्ष करीत आहोत असे व्यक्त केले आहे. अशा या अश्रुपूर्ण आत्मचरित्रात समाजातील वाईट परिस्थिती दाखवण्याचा प्रयत्न केला गेला आहे, हि कादंबरी वाचल्यानंतर वाचकाला माणुसकी या शब्दाचा खरा अर्थ नक्की समजून येईल.

3.उचल्या -लक्ष्मण गायकवाड
हि एक भटक्या विमुक्तांवरील अन्यायाला वाचा फोडणारी चरित्रात्मक कादंबरी आहे कि कादंबरी मराठी भाषेमधील सर्वात उत्तम आत्मकथा म्हणून नावारूपास आली आहे या आत्मकथनात लेखकाने भारतातील जात पंचायत पद्धतीतील काही निवडक निर्णय आणि त्यांचे झालेले परिणाम याबद्दल उल्लेख केला आहे.

4. आमचा बाप आन आम्ही – नरेंद्र जाधव
बाप म्हटलं कि आपल्या सर्वानाच आपला लाड करणारे व आपल्या सर्व इच्छा पूर्ण करणारे असे आदर्श वडील लक्षात येतात आणि नेमके याच मुद्द्यावर लेखकाने कादंबरी स्पष्ठ केली आहे. जाधवांनी यात स्वतःशी निगडित असे काही महत्वाचे मुद्दे मांडले आहेत यामुळे किंवा यातील इतर काही मुद्द्यांमुळे हि कादंबरी सर्वात जास्त खप असलेल्या कादंबर्यापैकी एक आहे.

5. मुसाफिर – अच्युत गोडबोले
या लेखकाचे प्रत्येक पुस्तक म्हणजे माहितीचा खजिना म्हणून ओळखले जाते मग ते विज्ञान असो किंवा कला असो त्यात नेमका मुद्दा धरून त्याचे रस उतरविण्याचे काम लेखक करतात, हे पुस्तक लेखकाने आपल्या स्वतःवर लिहिले आहे यात लेखकाने स्वतःचा उल्लेख हा मुसाफिर म्हणून केला आहे, काहीशी निराळी परंतु मनोरंजक अशी हि कादंबरी आहे.

असेच आणखीन भरपूर असे पुस्तके,कादंबऱ्या आहेत ज्या तुम्हाला नक्कीच आवडतील.
तुमची एखादी आवडती मराठी कादंबरी किंवा पुस्तक कमेंट करायला विसरू नका.