statue of unity

31 ऑक्टोबर 2018 हा दिवस भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जन्म दिवस आहे. संपूर्ण भारतात हा दिवस राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. या वेळी शहरात, महाविद्यालयात, अशा अनेक ठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. त्यात एकता दौड (ज्याला Ekta Rally असेही म्हटले जाते, त्याचे ही आयोजन केले जाते, संपूर्ण शहरातील विद्यार्थी आणि लोक या रॅलीत सहभागी होऊन भारताच्या एकतेला अजून मजबूत करण्याचं काम करतात.

Statue Of Unity म्हणून ओळखला जाणारा सरदार पटेलांच्या पुतळ्याचा लोकार्पण सोहळा देशाचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदींच्या हस्ते आज 31 ऑक्टोबर रोजी म्हणजे सरदार पटेलांच्या 143 व्या जयंती दिवशी गुजरात येथे पार पडणार आहे. यावेळी नरेंद्र मोदी लोकांना संबोधित करणार आहेत. या पुतळ्यासमोर प्रार्थना देखील करण्यात येणार आहे. तसेच प्रेक्षक गॅलरीचे सुद्धा उद्घाटन हातोहात मोदींच्या हस्ते होईल. या कार्यक्रमाच्या वेळी भारतीय हवाई दलाच्या विमानांकडून आकाशातून पुष्पवृष्टी देखील होणार आहे.

अहमदाबाद पासून 200 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या नर्मदा नदीवरील सरदार सरोवर धरणाजवळ स्थापलेला हा पुतळा सरदार पटेलांच्या जयंती दिवशीच लोकार्पीत करण्यात येणार आहे. सरदार वल्लभभाई पटेल हे स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री होते.

देशात मागच्या 3 वर्षांपासून सरदार पटेलांच्या पुतळ्याचे काम चालू आहे. त्याला Statue Of Unity असे नाव देण्यात आले आहे. हा पुतळा रेकॉर्ड वेळेत बनवण्यात आला आहे. एवढा भव्य आणि महाकाय पुतळा एवढ्या कमी वेळेत अजून कोठेच बनवला गेला नाही. या पुतळ्याला कांस्य क्ॅलडिंग करून बनवण्यात आले आहे.

जर तुम्ही या पुतळ्याची उंची मोजाल तर रोड वरील प्रवेशापासून त्याची उंची 182 मीटर इतकी आहे, आणि जर तुम्ही नदी मार्गाने या पुतळ्याला भेट दिली तर तुम्हाला याची उंची 208 मीटर इतकी असेल. चीनचा Spring Temple Of Buddha जे आहे ते 153 मीटर उंच आहे. त्या पुतळ्याच्या तब्बल जवळपास 20 मीटर हा पुतळा असणार आहे. आणि अमेरिकेच्या न्यूयॉर्क स्थित Statue Of Liberty च्या दुप्पट, हा भारतीय Statue Of Unity असणार आहे. अजून तरी एवढा भव्य पुतळा जगात कोठे नाही. भारतासाठी हा पुतळा खूप अभिमानाची गोष्ट आहे. सरदार पटेलांना अभिवादनासोबतच भारतीय इंजिनिअरिंग कौशल्य येथे दाखवण्यात आलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here