आपल्या दैनंदिन जीवनात कुठल्या गोष्टी आपल्यासाठी महत्वाच्या आहेत किंवा नाही हे आपणच ठरवतो. आपण आपल आयुष्य कशा पद्धतीने जगायला हवं हे सुद्धा आपणच ठरवतो, परंतु जीवनामध्ये अशा काही गोष्टी येतात ज्या आपले भविष्य बदलू शकतात. अशा काही गोष्टी ज्यामुळे आपले आयुष्य एकतर चांगल्या मार्गी लागेल किंवा उध्वस्त होऊ शकते. आज आपण अशाच काही गोष्टी पाहणार आहोत ज्यामुळे आपल्या आयुष्यात फरक पडायला नको.

  1. आपला भूतकाळ :- जीवनामध्ये खूप कमी वेळा आपला भूतकाळ महत्वाचा ठरतो अन्यथा आपले स्वप्न आणि आपला भविष्यकाळ हा महत्वाचा ठरतो. आपण जर चांगल्यातून वाईटमार्गाकडे जात असू तर आपले भूतकाळ आपल्याला परावृत्त करण्याचे काम करतो.
  2. वय :-तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये काही करून दाखवायचे असेल तर एवढे लक्षात घ्या कि तुमचे वय हे तुमच्या स्वप्नांच्या आडवे येऊ नये. जर तुम्ही तुमच्या वयाचा विचार करत बसाल तर तुम्ही फक्त विचारच करत राहाल.
  3. विचारांचा गोंधळ :-जीवनामध्ये तुम्ही तुमच्या स्वप्नांशी एकरूप होऊन त्याच्याकडे वाटचाल सुरु केली पाहिजे. प्रत्येक वेळी नवीन पर्याय उपलब्ध होत असतील तर येणाऱ्या पर्यायांमध्ये गोंधळून जाऊ नये. अनेक पर्यायांमधून योग्य तो निर्णय घेऊन पुढे जायचे.
  4. धैर्याने भविष्य घडवावे :- आपल्याला जर उत्तम भविष्य घडवायचे असेल तर कधीही कुठल्याही कार्यासाठी लाजू नये. जर तुम्ही येथे छोट्या मोठ्या कारणाहून लाजत बसाल तर तुमचे भविष्य हे तुम्हाला पाहिजे तसे नाही होऊ शकणार. आयुष्यातील प्रत्येक निर्णय हे धैर्याने घ्यावेत. कुठलाही निर्णय घेतेवेळी आपण डगमगायला नको.
  5. समाज :-सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे समाज. मी काही केलो तर काय म्हणतील आणी नाही केलो तर काय म्हणतील . आपला समाज आपल्या बद्दल काय विचार करेल याचा विचार तुम्ही नका करू, ते समाजाला करू द्या. तुम्ही फक्त तुमच्या स्वप्नांकडे वाटचाल सुरु ठेवा.
  6. तुमच्या आयुष्यात जर कुठली गोष्ट महत्वाची असेल ती म्हणजे आई-वडील आणि तुमची काळजी करणारे व्यक्ति.