आपल्या सर्व सणांपैकी सर्वात महत्वाचा सण म्हणजे दिवाळी. हि दिवाळी म्हणजे सुख, समृद्ध आणि उस्तवाचा जल्लोष असतो. आपण सर्वजणच दिवाळी साठी अतिशय उत्सुक असतो. वर्षभर आपण सर्वजण कुठेही राहत असलो तरी दिवाळीस मात्र एकत्र जमतो हे तितकेच खरे आहे. दिवाळी म्हणजे फटाके आले, लहान मोठ्यांमधील उत्साह, गोडधोड, घराची साफसफाई हे सर्व होय. आपण घरातील सर्वजण मिळून दिवाळी मध्ये आपले घर, ऑफिस किंवा दुकाने निटनिटके करायला सुरुवात करतो. तर या दिवाळी मध्ये आपण साफसफाईस सुरुवात करण्याअगोदर आपल्या सर्वांसाठी काही महत्वाच्या टीप्स आम्ही घेऊन आलो आहोत.

दिवाळी स्पेशल साफसफाई च्या टीप्स : –

  • घरातील साफसफाई करत असाल तर सर्वात अगोदर घरातील सर्व निकामी वस्तू बाजूला कराव्यात आणि त्यातील काही महत्वाचे आहे का ते तपासून निकामी वस्तू वेस्टेज मध्ये टाकाव्यात.
  • निकामी गोष्टी मध्ये तुमचे काही जुने कपडे असतील तर ते जाळून टाकण्यापेक्षा ते कपडे गोरगरिबांस किंवा ‘माणुसकी ची भिंत’ म्हणून जो महाराष्ट्रभर उपक्रम चालू आहे तेथे द्यावेत.
  • घरातील अडचणीच्या ठिकाणची सफाई करत असताना लांब झाडू किंवा व्हॅक्युम क्लीनर चा उपयोग करावा, जेणेकरून ती घाण तुमच्या अंगावर येऊ नये. अडचणीच्या ठिकाणात जास्त धूळ असते तर शक्यतो नाकाला रुमाल बांधूनच सफाई करावी.
  • घरातील पडदे, बेडशीट आणि पिल्लो कव्हर यासारख्या गोष्टी अगोदरच धुवून घ्याव्यात.
  • कमोड किंवा बाथरूम जास्तच घाण झाले असेल तर त्यासाठी ऍसिड चा उपयोग न करता तेथे तुम्ही ‘रिण अला’ वापरू शकता. यामुळे तुमचे कमोड स्वच्छ निघेल.
  • घराची साफसफाई करत असताना घरातील स्त्री एकटीच हे सर्व काम करू शकत नाही. तिला सर्वांनीच मदत करावी म्हणजे काम लवकर होईल आणि एकावरच कामाचा लोड येणार नाही.
  • ऑफिस किंवा दुकानाच्या साफसफाईस जास्त लोकांची गरज असते, तितकी साफसफाई तुमच्याने शक्य असेल तर करावी अन्यथा बाहेरची माणसे लावून तुम्ही सफाई करून घेऊ शकता.
  • सफाई करत असताना शिडी वगैरे व्यवस्थित हाताळावी, जेणेकरून कसलाही अपघात होऊ नये.
  • बाथरूम किंवा सिंक येथे डांबरगोळ्यांचा उपयोग करावा त्यामुळे घाण वास येणार नाही.

सफाई पूर्ण झाल्यानंतर तुम्ही दिवाळी साठी तुमचे वेगवेगळे प्लँन्स बनवू शकता. दिवाळी मध्ये आपण जास्त धम्माल कशी करायची याचे प्लॅन बनवू शकता. दिवाळी मध्ये दिवे किंवा फटाके लावत असताना ज्वलनशील वस्तूंजवळ लावू नये, याची काळजी घ्यावी. दिवाळी मध्ये आपण केलेली सफाई अशीच स्वच्छ राहावी यासाठी वरचेवर घर स्वच्छ ठेवण्याचे प्रयत्न करावेत.

सर्वांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here