देशाच्या सर्वोच्च बँकेने म्हणजेच RBI ने नुकतंच मार्गदर्शक नियमावली जारी केली आहे, त्यात तुम्हाला बँकेकडून फाटलेल्या खराब नोटांची किती किंमत मिळणार आहे, याबद्दलचे नियम सांगितलेले आहेत. नोव्हेंबर 2016 मध्ये जेंव्हा विमुद्रिकरण झाले होते तेंव्हा सरकारने रु 2000 आणि रु 200 या नव्या नोटा चलनात आणल्या होत्या आणि बाकीच्या नोटांना नवीन स्वरूप दिले होते. या नवीन नोटांसाठी आणि जुन्या नोटांसाठी सुद्धा सुधारित नियमावली RBI प्रसिद्ध केली आहे. ते नियम खालील प्रमाणे –

रु 2000 च्या नोटांसाठी –

नवीन नियमानुसार जर रु 2000 ची नोट फाटलेली असेल तर तुम्हाला,

i) जर फाटलेल्या नोटेचा 88% भाग अखंड असेल तर त्या फाटलेल्या नोटेच्या बदल्यात तुम्हाला तेवढ्याच किंमतीची रक्कम मिळेल.

ii) जर फाटलेल्या नोटेचा 44% भाग व्यवस्थित असेल तर त्या नोटेच्या बदल्यात अर्धीच रक्कम मिळेल, म्हणजे फक्त 1000 रु मिळतील.

रु 500 च्या नोटांसाठी –

नवीन नियमानुसार जर रु 500 ची नोट फाटलेली असेल तर तुम्हाला,

i) जर फाटलेल्या नोटेचा 80% भाग अखंड असेल तर त्या फाटलेल्या नोटेच्या बदल्यात तुम्हाला तेवढ्याच किंमतीची पूर्ण रक्कम मिळेल.

ii) जर फाटलेल्या नोटेचा 40% भाग व्यवस्थित असेल तर त्या नोटेच्या बदल्यात अर्धीच रक्कम मिळेल, म्हणजे फक्त 250 रु मिळतील.

रु 200 च्या नोटांसाठी –

नवीन नियमानुसार जर रु 200 ची नोट फाटलेली असेल तर तुम्हाला,

i) जर फाटलेल्या नोटेचा 78% भाग अखंड असेल तर त्या फाटलेल्या नोटेच्या बदल्यात तुम्हाला तेवढ्याच किंमतीची रक्कम मिळेल.

ii) जर फाटलेल्या नोटेचा 39% भाग व्यवस्थित असेल तर त्या नोटेच्या बदल्यात अर्धीच रक्कम मिळेल, म्हणजे फक्त 100 रु मिळतील.

रु 100 च्या (नवीन) नोटांसाठी –

नवीन नियमानुसार जर रु 100 ची नवीन नोट फाटलेली असेल तर तुम्हाला,

i) जर फाटलेल्या नोटेचा 75% भाग अखंड असेल तर त्या फाटलेल्या नोटेच्या बदल्यात तुम्हाला तेवढ्याच किंमतीची रक्कम मिळेल.

ii) जर फाटलेल्या नोटेचा 38% भाग व्यवस्थित असेल तर त्या नोटेच्या बदल्यात अर्धीच रक्कम मिळेल, म्हणजे फक्त 50 रु मिळतील.

रु 100 च्या (जुन्या) नोटांसाठी –

नवीन नियमानुसार जर रु 100 ची जुनी नोट फाटलेली असेल तर तुम्हाला,

i) जर फाटलेल्या नोटेचा 92% भाग अखंड असेल तर त्या फाटलेल्या नोटेच्या बदल्यात तुम्हाला तेवढ्याच किंमतीची रक्कम मिळेल.

ii) जर फाटलेल्या नोटेचा 46% भाग व्यवस्थित असेल तर त्या नोटेच्या बदल्यात अर्धीच रक्कम मिळेल, म्हणजे फक्त 50 रु मिळतील.

अशी हि नवीन नियमावली आहे त्यामुळे आता जर चुकून तुमची नोट फाटली तर काळजी करण्याचे कारण नाही, या नवीन नियमावलीनुसार तुम्ही तुमच्या नोटेचा मोबदला घेऊ शकता.

हि महत्वाची माहिती आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका.!